Police reveal shocking details about the tennis academy in the latest twist of Radhika Yadav’s murder case.  esakal
देश

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Radhika Yadav murder case major twist : जाणून घ्या, आता पोलिसांनी या प्रकरणाबाबत काय म्हटले?

Mayur Ratnaparkhe

police reveal shocking facts about Radhika Yadav tennis academy : सर्वत्र खळबळ माजवलेल्या गुरुग्राममधील टेनिसपटू राधिका यादव हिच्या हत्या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणाची पोलिस सखोल तपास करत आहेत, मात्र त्यांनी आता असा असा दावा केला आहे, की राधिका यादव हिची स्वतःची टेनिस अकादमी नव्हती आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी टेनिस कोर्ट बुक करून खेळाडूंना प्रशिक्षण देत होती. यावरूनच तिचे वडील दीपक यादव ही चिडलेले होते. राधिका यादवच्या वडिलांवरच  तिच्या हत्येचा आरोप आहे. 

दरम्यान या हत्याकांडाचा तपास करणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की, "राधिकाची स्वतःची अकादमी नव्हती. ती वेगवेगळ्या ठिकाणी टेनिस कोर्ट बुक करून नवीन खेळाडूंना प्रशिक्षण देत असे. वडील दीपक यादवने  तिला अनेक वेळा प्रशिक्षण थांबवण्यास सांगितले होते, परंतु तिने नकार दिला होता. यावरूनच दोघांमध्ये भांडण झाले होते."

यापूर्वी, राधिकाची टेनिस अकादमी असण्याचा मुद्दा समोर आला होता. पोलिसांनी सांगितले होते की राधिका टेनिस अकादमी चालवत होती आणि तिचे वडील त्याविरुद्ध होते. वडील आणि मुलीमध्ये वाद झाला होता. पोलिस चौकशीदरम्यान, आरोपी वडील दीपकने सांगितले होते की, त्याच्या मुलीच्या कमाईवर अवलंबून राहिल्याबद्दल त्याला अनेकदा लोकांकडून टोमणे मारले जात होते. तो मानसिक तणावाखाली होता आणि म्हणूनच त्याने हा गुन्हा केला.

गुरुवार (१० जुलै) रोजी गुरुग्राममधील सेक्टर ५७ मधील सुशांत लोक येथील एका दुमजली घरात ही घटना घडली. या घरात दीपक यादवने त्याची २५ वर्षीय मुलगी राधिका यादव हिची गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप आहे. राधिकाचे पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांनी शुक्रवारी सांगितले होते की तिच्या शरीरातून चार गोळ्या काढण्यात आल्या आहेत.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी वडील दीपक यादवने मुलीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. आरोपीला शुक्रवारी (११ जुलै) न्यायालयात हजर करण्यात आले, जिथून त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. पोलिसांनी त्याच्या सेक्टर ५७ मधील घरातून काडतुसे जप्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT