Rafael aircraft,France , India 
देश

'फ्रान्स टू इंडिया' 5 राफेल लढाऊ विमानांचे भारताच्या दिशेने उड्डाण; 7364 किमी अंतर कापणार

सुशांत जाधव

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण दलांची राफेलची प्रतिक्षा अखेर संपली आहे. सोमवारी फ्रान्सच्या हवाई तळावरुन 5 लढाऊ राफेल विमानांनी भारताच्या दिशेने उड्डान भरले. भारतीय हवाई दलातील वैमानिक या विमानांचे संचालन करत भारतात दाखल होणार आहेत. इंधन भरण्यासाठी ही विमाने संयुक्त अरब अमीरातमधील अल धाफरा विमानतळावर उतरतील. त्यानंतर ती पुन्हा भारताच्या दिशेने झेपावतील. 5 राफेल विमाने 7364 किमी हवाई अंतर पार करुन  बुधवारी  अंबाला तळावर उतरणार आहेत. भारत-चीन यांच्यातील तणावपूर्ण परिस्थिती भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात ही विमाने सामील झाल्यानंतर भारताची ताकद आणखी वाढेल, असे बोलले जात आहे.

भारताने फ्रान्ससोबत 36 विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे. यातील पहिल्या टप्प्यात 5 विमाने भारतात दाखल होत आहेत. आतापर्यंत 12 लढाऊ विमानाच्या वैमानिकांनी  फ्रान्समध्ये राफेल लढाऊ विमानाचे प्रशिक्षण घेतले असून आणखी काही वैमानिकांना प्रशिक्षण दिले जात आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यात सामंजस्य करारान्वये दोन्ही देशांतील एकूण 36 हवाई दलाच्या वैमानिकांना एविएटर्स द्वारा राफेल लढाऊ विमानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. फ्रान्समध्ये राफेल विमानाचे प्रशिक्षण पूर्ण केलेला भारतीय हवाई दलातील वैमानिक भारतामध्ये सराव करतील.

पहिल्या टप्प्यात फ्रान्सकडून 10 राफेल लढाऊ विमाने देण्यात येणार होती. पण अन्य विमाने तयार नसल्यामुळे सध्या 5 विमाने भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामील करण्यात येणार आहेत.  2 जून रोजी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांशी दूरध्वनीवरुन संवाद साधला होता. यावेळी फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेंस पार्ले यांनी कोरोना विषाणूच्या संकटामुळे पहिल्या टप्प्यात 10 ऐवजी 5 विमाने देणेच शक्य असल्याचे स्पष्ट केले होते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

SCROLL FOR NEXT