देश

MP : MGM वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगप्रकरणी पुरावे सादर, पोलिसांकडून 8 जणांवर कारवाई

वरिष्ठ महाविद्यालयातील काही सिनीअर विद्यार्थी अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

वरिष्ठ महाविद्यालयातील काही सिनीअर विद्यार्थी अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे.

मध्य प्रदेशातील इंदूर येथील महात्मा गांधी मेमोरियल वैद्यकीय महाविद्यालयातील रॅगिंगची प्रकरणे आता जोर धरत आहेत. याप्रकरणी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रॅगिंगचे पुरावे सादर केल्याचा दावा केला आहे. वरिष्ठ महाविद्यालयातील काही सिनीअर विद्यार्थी अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. यातील एक विद्यार्थी एका मुलींवर अश्लील कमेंट करत होता, अशी एका पीडित विद्यार्थ्यांची तक्रार समोर आल्यानंतर व्यवस्थापनाने पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी पीडित विद्यार्थ्यांनी ही तक्रार केवळ महाविद्यालय प्रशासनाकडे न करता दिल्लीतील अँटी रॅगिंग समितीकडेही केली होती. या समितीकडून महाविद्यालय व्यवस्थापनाला ईमेलद्वारे माहिती मिळाली असून रविवारी अँटी रॅगिंग समितीची बैठक झाली आहे.

मिळालेल्या माहिती अशी की, सध्या याप्रकरणी रॅगिंग करण्याची मागणी करणाऱ्या ८ विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे. मागील ३ महिन्यांपासून प्रथम वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांचे रॅगिंग सुरु असल्याचा आरोप आहे. रॅगिंग विरोधात एका विद्यार्थ्याने सर्व तांत्रिक पुरावे गोळा करून दिल्ली यूजीसी आणि अँटी रॅगिंग समितीकडे पाठवले. यात ऑडिओ, चॅटिंग आणि लोकेशनसह इतर पुराव्यांचा समावेश आहे. त्यामुळे समिनीने प्रशासनाला यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

महाविद्यालयातील सिनियर्स मोठ्या आवाजात अश्लील बोलतात. एखाद्या विद्यार्थ्याने नावाचा चुकीचा उच्चार केला तर त्याच्या सहकारी विद्यार्थ्यांना चापट मारली जाते. वर्गातील विद्यार्थिनींच्या नावाने गलिच्छ कमेंट करणे, विद्यार्थ्यांना जबरदस्तीने त्यांच्या घराचा पत्ता विचारणे, वर्गात मुंडण करून येण्यास सांगणे, असे काही आरोप या विद्यार्थ्यांकडून करण्यात आले आहेत.

रॅगिंगसाठी हे सिनिअर विद्यार्थी फ्लॅटवर बोलावत होते, असंही एका विद्यार्थ्यांचे सांगितले आहे. तेथे त्यांना अनैसर्गिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जात होते. कोणतेही रेकॉर्ड होऊन पुरावे मिळू नये यासाठी त्यांचे मोबाईल काढून घेतले जात होते. हा मानसिक छळ असल्याची जाणीव अनेकांना झाली असल्याने त्यांनी पुरावे गोळा करत तक्रार केली. सध्या या रॅगिंग प्रकरणातील पुरावे पोलिसांना देण्यात आले असून त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र नियमानुसार विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Allegation : आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे निवडणूक जिंकले, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

Hatkanangale Railway Accident : हेडफोन घालून मोबाईलवर बोलत निघालेल्या 17 वर्षीय युवतीचा रेल्वेखाली करुण अंत; डॉ. आंबेडकर वसतिगृहासमोरील रेल्वे रुळावर धक्कादायक घटना

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा

१ हजार ते ६,००० रुपयांत गरबा पार्टनर, व्हायरल पोस्टरनंतर भाजप आमदार आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT