Rahul Gandhi Sakal
देश

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

Rahul Gandhi slams Modi government:मोदीजींचे डबल इंजिन चालू आहे, पण ते फक्त अब्जाधीशांसाठी आहे. सर्वसामान्य भारतीयांसाठी, हे भ्रष्ट डबल इंजिन सरकार विकास नाही, तर विनाशाचा वेग आहे , असंही राहुल गांधींनी म्हटलंय

Mayur Ratnaparkhe

Rahul Gandhi criticizes the Modi government लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारांवर जोरदार निशाणा साधला आहे. इंदूरमधील दूषित पाणी आणि विषारी कफ सिरपमुळे झालेल्या मृत्यूंपासून ते अंकिता भंडारीसारख्या घटनांपर्यंतचे मुद्दे राहुल गांधींनी उपस्थित केले.

भाजपवर टीका करताना राहुल गांधींनी दावा केला की, देशभरातील भ्रष्ट जनता पक्षाच्या डबल-इंजिन सरकारांनी लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे आणि भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर आणि अहंकाराचे विष भाजपच्या राजकारणात वरपासून खालपर्यंत पसरले आहे. तसेच, त्यांनी असाही आरोप केला की भाजपच्या व्यवस्थेत गरीब, असहाय्य, कामगार आणि मध्यमवर्गीयांचे जीवन केवळ आकडेवारी आहे आणि विकासाच्या नावाखाली खंडणीची व्यवस्था कार्यरत आहे.

एक्सवरील एका पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले की, उत्तराखंडमध्ये अंकिता भंडारीच्या क्रूर हत्येने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. पण प्रश्न असा राहतो, सत्तेच्या आडून भाजपच्या कोणत्या व्हीआयपीला संरक्षण दिले जात आहे? कायदा सर्वांसाठी कधी समान असेल? तसेच, उत्तर प्रदेशातील उन्नाव घटनेत, सत्तेच्या अहंकाराने गुन्हेगारांना कसे संरक्षण दिले आणि पीडितेला न्यायासाठी किती किंमत मोजावी लागली हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.

याशिवाय, दूषित पाण्यापासून ते अरवलीच्या मुद्द्यापर्यंत राहुल गांधीं म्हणाले की, इंदूरमधील विषारी पाणी पिण्यामुळे होणारे मृत्यू असोत किंवा गुजरात, हरियाणा आणि दिल्लीमध्ये "काळे पाणी" आणि दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी असोत, सर्वत्र रोगाची भीती आहे. राजस्थानमधील अरवली असोत किंवा नैसर्गिक संसाधने असोत, अब्जाधीशांचा लोभ आणि स्वार्थ जिथे पोहोचतो तिथे नियमांचे उल्लंघन केले जात आहे. पर्वत तोडले जात आहेत, जंगले नष्ट केली जात आहेत - आणि जनतेला त्या बदल्यात धूळ, प्रदूषण आणि आपत्ती मिळत आहेत. अशा शब्दांता राहुल गांधीनी टीका केली आहे.

तर, कफ सिरपमुळे मरणाऱ्या मुलांचे, सरकारी रुग्णालयांमध्ये नवजात बालकांना मारणाऱ्या उंदरांचे आणि सरकारी शाळांच्या छतांचे पडण्याचे मुद्दे उपस्थित करताना राहुल गांधी म्हणाले की हे "निष्काळजीपणा" नाही तर भ्रष्टाचाराचे थेट परिणाम आहेत. तसेच, केंद्र सरकारवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले, मोदीजींचे डबल इंजिन चालू आहे, पण ते फक्त अब्जाधीशांसाठी आहे. सर्वसामान्य भारतीयांसाठी, हे भ्रष्ट डबल इंजिन सरकार विकास नाही, तर विनाशाचा वेग आहे जो दररोज कोणाचा तरी जीव चिरडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope : 12 तारखेपासून सुरू होतोय गजकेसरी राजयोग! वृषभसह 4 राशीचं भाग्य उजळणार; होणार धनलाभ, प्रेमात यश, मोठं स्वप्न होईल पूर्ण

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

SCROLL FOR NEXT