देश

'जो म्हणायचा माँ गंगेने मला बोलावलंय, त्यानेच तिला रडवलंय'

विनायक होगाडे

()नवी दिल्ली : कोरोनाच्या (Corona Crisis) या संकटादरम्यान अनेक चित्रविचित्र घटना घडताना पहायला मिळत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या गंगा नदीमध्ये अनेक मृतदेह तरंगताना आढळून आले आहेत. (Dead Bodies Floating In Ganges) असं म्हटलं जातंय की, कोरोना रुग्णांचे हे मृतदेह आहेत, ज्यांना हॉस्पिटल्स आणि नातेवाईकांनी मृत्यूनंतर गंगा नदीत सोडून दिलं आहे. या सगळ्या प्रकरणावरुन उत्तर प्रदेश आणि बिहार सरकारवर निशाणा साधण्यात येतो आहे. तसेच यावरुन आता केंद्र सरकारवर देखील प्रश्नांची सरबत्ती होत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कोरोना व्हायरससंदर्भातील (Corona Virus)देशाच्या परिस्थितीवरुन केंद्र सरकारवर सातत्याने प्रश्न उभे केले आहेत. राहुल गांधी यांनी म्हटलंय की, केंद्र सरकार (Modi Government) कोरोनाची ही परिस्थिती हाताळण्यामध्ये सफशेल अपयशी ठरलं आहे. (Rahul Gandhi Attacked PM Modi Maa Ganga ne bulaya hai usne Maa Ganga ko rulaya hai)

राहुल गांधी यांनी आता या गंगा प्रकरणावरुन देखील मोदींवर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलंय की, जो म्हणायचा की माँ गंगाने मला बोलावलं आहे, त्यानेच गंगेला रडवलं आहे. राहुल गांधी यांनी या ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांचं कुठेही नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

याआधी देखील राहुल गांधी यांनी टीका करताना म्हटलं होतं की, केंद्र सरकारचं लसीसंदर्भातील धोरण सध्याच्या समस्येला आणखीनच बिघडवून टाकत आहे. वास्तवात केंद्र सरकारने लस खरेदी केली पाहिजे आणि त्याच्या वितरणाची जबाबदारी राज्यांना द्यायला हवी, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

तर दुसरीकडे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देखील ट्विट करत या साऱ्या प्रकरणावरुन सरकारवर निशाणा साधला आहे. गंगेमध्ये तरंगणारे मृतदेह फक्त आकडे नाहीयेत तर ते कुणाचे तरी वडील, आई, भाऊ आणि बहिण आहेत. सरकार उत्तरदायी आहे ज्यांनी आपल्याच लोकांची अशी ही वाईट अवस्था केली आहे.

शुक्रवारी भारतात 3 लाख 26 हजार 98 नवीन रुग्ण सापडले. तर 3 लाख 53 हजार 299 जण कोरोनामुक्त झाले. तर गेल्या 24 तासात 3 हजार 890 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत भारतात एकूण 2 कोटी 43 लाख 72 हजार 907 जणांना कोरोनाची लागण झाली असून 2 कोटी 4 लाख 32 हजार 898 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 2 लाख 66 हजार 207 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. सध्या देशात 36 लाख 73 हजार 802 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT