Ghulam Nabi Azad Latest news
Ghulam Nabi Azad Latest news Ghulam Nabi Azad Latest news
देश

राहुल गांधींकडे राजकीय कुशाग्र बुद्धी नाही; गुलाम नबी आझाद यांचा हल्लाबोल

सकाळ डिजिटल टीम

Ghulam Nabi Azad Latest news नवी दिल्ली : राहुल गांधींकडे (Rahul Gandhi) राजकीय कुशाग्र बुद्धी नाही. राजकारणात प्रवेश केल्यापासून काँग्रेसची हीच अवस्था आहे. काँग्रेस कार्यकारिणीलाही काही अर्थ नाही. सोनिया गांधींच्या काळात फक्त सीडब्ल्यूसी होती. परंतु, १० वर्षांत २५ सदस्य आणि ५० विशेष निमंत्रितांपर्यंत वाढले आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचा सर्वांना सोबत घेऊन सहमतीने राजकारण करण्यावर विश्वास ठेवत. परंतु, राहुल गांधींच्या बाबतीत तसे नाही, असे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) म्हणाले.

सोनिया गांधींनी १९९८ ते २००४ पर्यंत सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे काम केले. मोठ्या नेत्यांचे सल्ले त्या घेत असे. त्यांनी मला आठ राज्यांची जबाबदारी दिली होती. सात राज्यांत विजय मिळाला. त्यांनी कुठेही हस्तक्षेप केला नाही. २००४ नंतर राहुल गांधींचा (Rahul Gandhi) प्रवेश झाल्यापासून ही व्यवस्था संपुष्टात आली आहे. सोनिया गांधी यांचे राहुलवरील अवलंबित्व वाढले आहे. मात्र, राहुल गांधींकडे राजकीय कौशल्य नाही. सर्वांनी राहुल गांधींशी समन्वय साधावा, अशी सोनिया गांधींची इच्छा आहे.

नरेंद्र मोदी हे निमित्त आहे. G-२३ च्या वतीने पत्र लिहिल्यापासून या लोकांना माझ्याशी समस्या होत्या. त्यांना कोणीही लिहू नये किंवा प्रश्न विचारावा असे वाटत नाही. काँग्रेसच्या अनेक बैठका झाल्या; पण, एकही सूचना मान्य झाली नाही. मला काँग्रेस (Congress) सोडण्यास भाग पाडले, असे गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी काँग्रेसने स्वतःवर केलेल्या हल्ल्यांना उत्तर देताना सांगितले.

गुलाम नबी आझाद यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेस सोडताना सोनिया गांधींना पाच पानी पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी काँग्रेसमध्ये चांगली व्यवस्था असल्याचे म्हटले होते. सोनिया गांधींच्या काळात ते कायम होते. परंतु, राहुल गांधींच्या आगमनाने सर्व काही कोलमडले. याशिवाय २०१४ मध्ये काँग्रेसच्या पराभवासाठी राहुल गांधींच्या वृत्तीला जबाबदार धरले. राहुल गांधी यांनी मंत्रिमंडळाने काढलेला अध्यादेश फाडला होता. त्यामुळे खुद्द पंतप्रधान आणि सरकारची प्रतिष्ठा पणाला लागली, असेही आझाद म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS Live Score : हैदराबादला तिसरा धक्का! अर्धशतक करणाऱ्या अभिषेक शर्माला शशांक सिंगने धाडलं माघारी

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

SCROLL FOR NEXT