Rahul Gandhi is responsible for not joining Prashant Kishor Congress Rahul Gandhi is responsible for not joining Prashant Kishor Congress
देश

राहुल गांधींच्या उदासीनतेने बिघडले काम! PK गोटातून नवी माहिती

सकाळ डिजिटल टीम

प्रदीर्घ चर्चेनंतर प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये जाण्यास नकार दिला. यामुळे विविध चर्चा सुरू आहेत. काँग्रेसने त्यांच्या काही सूचना आणि मागण्या मान्य न केल्याने असे घडल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांना काँग्रेसमध्ये अहमद पटेल यांची भूमिका स्वत:साठी हवी होती. त्यावर हायकमांडमध्ये एकमत नव्हते. आता प्रशांत किशोर गोटातून नवीन माहिती समोर आली आहे. सादरीकरणात राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) उदासीनतेमुळे हे प्रकरण बिघडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (Rahul Gandhi is responsible for not joining Prashant Kishor Congress)

प्रशांत किशोर यांना काँग्रेसबद्दल दोन शंका होत्या. पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेस (Congress) नेतृत्वात मोठ्या बदलासाठी तयार नव्हती. पीकेंनी प्रियांका गांधींना राष्ट्रीय अध्यक्ष बनवावे किंवा गांधी नसलेल्या नेत्याला कमांड द्यावी, असे म्हटले होते. यावर काँग्रेसमध्ये एकमत नव्हते. याबाबत राहुल गांधींची उदासीनताही प्रशांत किशोर यांच्या मनात शंका निर्माण करण्याचे कारण ठरली. राहुल गांधी यांनी प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या हायकमांडच्या भेटीपासून अलिप्त राहून परदेश दौऱ्यावर गेले.

पक्ष बदलासाठी तयार असल्याचे सांगत असले तरी प्रशांत किशोर यांचा राहुल गांधींवर विश्वास राहिलेला नाही. प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेसचे (Congress) प्रवक्ते पवन खेरा म्हणाले की, आम्ही एक पक्ष आहोत आणि त्यात बदल करण्याच्या प्रक्रियेत आहोत. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही बदल करायला नक्कीच तयार आहोत. पीके सूत्रांचे म्हणणे आहे की, त्यांना वाटते की काँग्रेस नेतृत्व त्यांच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यास तयार नाही. याशिवाय राहुल गांधीही (Rahul Gandhi) यात रस दाखवत नाहीत.

प्रशांत किशोर यांना राहुल गांधींचा पाठिंबा अपेक्षित होता

पीकेंशी (Prashant Kishor) संबंधित लोक म्हणतात की त्यांना राहुल गांधींचा पाठिंबा अपेक्षित होता. परंतु, ते अलिप्त राहिले. प्रियांका गांधी यांनी पूर्ण उत्साह दाखवला आणि प्रत्येक बैठकीला हजेरी लावली. याशिवाय सोनिया गांधी यांनीही पूर्ण रस दाखवत प्रत्येक बैठकीचे अध्यक्षपदही भूषवले. परंतु, राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) टीममध्ये अजूनही काँग्रेसचाच दबदबा आहे. प्रशांत किशोर यांच्या सूचनांबाबत ते फारसे उत्साही दिसले नाहीत. त्यामुळे प्रशांत किशोरमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरीत 20 लाखांहून अधिक भाविकांचा जनसागर; संतांच्या सर्व पालख्या पंढरपुरात दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

मोदी सरकारचा एक निर्णय, 2 पालखी मार्गांसाठी मिळाले 12 हजार 41 कोटी! 365 किमी मार्गांमुळे पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन सुलभ; पालखी मार्गांची वैशिष्ट्ये काय? वाचा...

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

SCROLL FOR NEXT