Rahul Gandhi News sakal
देश

सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देऊ : राहुल गांधी

सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबाची राहुल गांधी यांनी भेट घेतली.

सकाळ डिजिटल टीम

चंदीगड : काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मंगळवारी (ता.सात) पंजाबी गायक तथा पक्षाचे नेते सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबाची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यावेळी गांधी यांनी मुसेवाला कुटुंबाचे सांत्वन केले. भेटीनंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विट केले आहे. (Rahul Gandhi Meet Siddhu Moosewala's Family In Mansa Of Punjab)

त्यात ते म्हणतात, काँग्रेस (Congress Party) नेता सिद्धू मुसेवाला (Siddhu Moosewala) यांच्या आई-वडिलांची भेट घेतली. ते कठीण परिस्थितीतून जात असून ते सांगणे अवघड आहेत. त्यांना न्याय मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे. ते आम्ही मिळवून देऊच, असा विश्वास राहुल यांनी व्यक्त केला. राज्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. पंजाबमध्ये शांतता व सुव्यवस्थे राखणे आप सरकारच्या आवाक्यातील गोष्ट नाही, असा टोला त्यांनी पंजाब सरकारला लगावला आहे.

पुणे कनेक्शन

सिद्धू मुसेवाला हत्येचं पुणे कनेक्शन स्पष्ट झाले आहे. संतोष जाधव (वय २४, रा.पोखरी, ता.आंबेगाव) व सौरभ महाकाळ (रा.मढ-पारगाव, ता.जुन्नर) यांनी मुसेवाला यांची हत्या केले असल्याचे उघड झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT