Rahul Gandhi Sakal
देश

Rahul Gandhi Birthday: स्वत:चे घरही नसलेल्या राहुल गांधींकडे किती आहे संपत्ती?

राहुल गांधी हे देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाचे नेते आहेत.

राहुल शेळके

Rahul Gandhi Net Worth: राहुल गांधी हे देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाचे नेते आहेत. 1970 मध्ये राहुल गांधींचा जन्म झाला आज ते 53 वर्षांचे झाले आहेत.

दरम्यान, तीनवेळा खासदार झालेले आणि नुकतेच सदस्यत्व गमावलेल्या राहुल गांधी यांच्या मालमत्तेत त्यांचे स्वतःचे घरही नाही. फक्त शेतजमीन आणि पोस्ट ऑफिस इत्यादींमध्ये केलेली काही गुंतवणूक आहे.

राहुल गांधी दरवर्षी सुमारे एक कोटी रुपयांच्या उत्पन्नावर आयकर भरतात. 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांनी गेल्या सलग 5 वर्षांपासून सुमारे 1 कोटी रुपयांच्या उत्पन्नावर आयकर भरला होता.

राहुल गांधींच्या नावावर घर नाही तर दुकान आहे

राहुल गांधींच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची मालमत्ता सुमारे 15 कोटी रुपये आहे, तर त्यांच्यावर सुमारे 72 लाख रुपयांचे कर्ज आहे. राहुल गांधी यांचे दिल्लीतील महरौली येथे एक शेत आहे ज्याची किंमत सुमारे एक कोटी रुपये आहे.

गुरुग्राममधील एका व्यावसायिक इमारतीत त्यांची जागा आहे. त्याची किंमत 8.75 कोटी रुपये आहे. एक प्रकारे त्यांच्याकडे घर नसून दुकान (व्यावसायिक जागा) आहे.

पोस्ट ऑफिस शेअर्समध्ये गुंतवणूक:

राहुल गांधींच्या 3 खात्यांमध्ये सुमारे 18 लाख रुपये आहेत. बाँड-डिबेंचर्स आणि शेअर्समध्ये त्यांनी एकूण सुमारे 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

तर राहुल गांधी यांनी पोस्ट ऑफिस योजनांमध्ये सुमारे 40 लाख रुपयांची गुंतवणूक केली असून त्यांच्याकडे 2.91 लाख रुपयांचे दागिने आहेत. राहुल गांधी यांच्याकडे स्वतःचे कोणतेही वैयक्तिक वाहन नाही.

राहुल गांधी हे केरळच्या वायनाड मतदारसंघाचे खासदार होते. याआधी ते दोन वेळा उत्तर प्रदेशच्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून खासदार झाले आहेत. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत स्मृती इराणी यांनी त्यांचा अमेठीमधून पराभव केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतोय! सिद्धरामय्यांची घोषणा, डीके शिवकुमार यांनी चरणस्पर्श करत घेतले आशीर्वाद

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

Washim Accident: आनंदाचा क्षण काळ ठरला! धोंड्याच्या जेवणावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू..

Kalyan Crime : ६ महिन्यांपूर्वी लग्न केलेल्या २५ वर्षीय लेकीची हत्या, वडिलांवरच संशय; काय घडलं?

Asian Relay India Host: भारताला मिळाली सर्वात मोठी गूड न्यूज! आशियाई स्पर्धांचे यजमानपद बहाल; पण सामने 'या' दोन शहरांत का होणार?

SCROLL FOR NEXT