rahul gandhi esakal
देश

'मी पंतप्रधान झालो तर...'; राहुल गांधींच्या उत्तराने जिंकले मन

लहानपणीच्या काही आठवणी जाग्या करत 'भावाने नेमबाजी स्पर्धेत बरीच पदके जिंकली होती', असंही प्रियांका यांनी म्हटल आहे.

सकाळ डिजिटल टीम

लहानपणीच्या काही आठवणी जाग्या करत 'भावाने नेमबाजी स्पर्धेत बरीच पदके जिंकली होती', असंही प्रियांका यांनी म्हटल आहे.

भाऊबीजेच्या दिवशी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक जुना फोटो सोशल मिडियावर शेअर केला होता. 'माझा भाऊ करुणा, प्रेम आणि धैर्याने सत्यासाठी लढत असल्याचा मला अभिमान आणि आनंद आहे. तुम्हा सर्वांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा.' या कॅप्शनसहित हा फोटो त्यांनी पोस्ट केला होता. लहानपणीच्या काही आठवणी जाग्या करत 'भावाने नेमबाजी स्पर्धेत बरीच पदके जिंकली होती', असंही प्रियांका यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं होत.

दरम्यान, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी कन्याकुमारी येथील सेंट जोसेफ मॅट्रिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी संभाषणाचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. दिवाळी छान साजरी झाल्याचं त्यांनी यात म्हटलं आहे. या संभाषणादरम्यान, तुम्ही पंतप्रधान झालात तर पहिला कोणता निर्णय घ्याल, असा प्रश्न राहुल गांधींना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न करता 'महिलांना आरक्षण देईन', असं उत्तर दिलं. यावेळी ते पुढे म्हणाले, 'जर मला कोणी विचारलं तुमच्या मुलांना काय शिकवाल, तर मी विनम्रता शिकवेन. कारण विनम्रता ही अशी गोष्ट आहे की त्यामुळे तुम्हाला समज यायला मदत होते'. भेटण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळातील एका सदस्याने दोघांचे शेतकरी संघर्षातील सहभागाचे कौतुक केले. यातून तुमची लोकांशी असलेली एकजूट दिसून येते, अशा शब्दात त्यांनी राहुल गांधी आणि प्रियांकांचं कौतुक केलं.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या या उत्तराचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून अनेकांना यावर कमेंट्स आणि लाईक केले आहेत. त्यांच्या या उत्तरावर अनेक महिलांनीही सकारात्क कमेंट्स केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT