Rahul Gandhi Sakal
देश

Rahul Gandhi Security Breached : PM मोदींनंतर राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; सुरक्षा भेदत...

या घटनेनंतर सुरक्षा एजन्सींकडून राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Rahul Gandhi Security : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत चूक झाल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत.

हेही वाचा - भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

त्यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याचे समोर आले आहे.

पंजाबमधील होशियारपूरमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी पुढे जात असताना अचानक एक व्यक्ती सुरक्षा भेदत राहुल गांधींजवळ पोहोचला यावेळी त्याने राहुल गांधींची गळाभेट घेण्याचा प्रयत्न केला.

सुरक्षा भेदत संबंधित व्यक्ती अचानक राहुल गांधींच्या जवळ पोहोचल्या काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, राहुल गांधींनी संबंधित व्यक्तीला बाजूला केले. त्यानंतर उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला बाहेर काढले.

अलर्ट जारी

दरम्यान, या घटनेनंतर सुरक्षा एजन्सींकडून राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

एजन्सींच्या मते राहुल गांधींच्या काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान मोठी चूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राहुल गांधींना काश्मीरमध्ये काही ठिकाणी न फिरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

राहुल यांच्या सुरक्षेबाबत पक्षाच्या वतीने गृहमंत्रालयाला दोनदा पत्र लिहिण्यात आले असून, त्यावर केंद्राकडून राहुल गांधींनी अनेकदा सुरक्षा मानकांचे पालन केले नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

SCROLL FOR NEXT