rahul gandhi pm modi.jpg 
देश

राहुल गांधींनी शेअर केला मोदींची खिल्ली उडवणारा व्हिडिओ

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांचा डेन्मार्कच्या पंतप्रधानांबरोबरील चर्चेदरम्यानचा एक व्हिडिओ राहुल गांधी यांनी शेअर करत आमच्या पंतप्रधानांना काही समजत नाही, असे म्हटले आहे. 'खरा धोका हा नाही की, आमच्या पंतप्रधानांना काही समजत नाही. धोका हा आहे की त्यांच्याजवळ असणाऱ्यांपैकी एकाचीही हे सांगण्याची हिंमत नाही,' असा टोला त्यांनी आपल्या टि्वटमधून लगावला आहे. 

या व्हिडिओत मोदी हे पवन ऊर्जेबाबत बोलत आहेत. पवनचक्कीच्या माध्यमातून हवेतून पाणी काढता येते, असे पंतप्रधान मोदी यांनी डेन्मार्कच्या पंतप्रधानांना सांगितले. राहुल गांधी यांच्या या टि्वटनंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी राहुल यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केला. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी तर या विषयाशी निगडीत संशोधनाच्या बातम्याच टि्वट करत राहुल गांधी यांनी एकदा हे वाचावे, असा सल्ला दिला. 

पंतप्रधान मोदी यांनी पवन ऊर्जा आणि पाण्याबाबत सांगितल्यानंतर डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी स्मित हास्य करत मोदींनी डेन्मार्कला येऊन येथील अभियंत्यांना हे तंत्र समजवण्याचे निमंत्रण दिले. 

राहुल गांधी यांच्या या टि्वटनंतर तासाभरातच भाजप नेत्यांनी पलटवार करण्यास सुरुवात केली. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी म्हटले की, राहुल गांधीं यांना काहीच समजत नाही, असे सांगण्याची हिंमत असलेले त्यांच्याजवळ कोणीच नाही. ते पंतपधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांची खिल्ली उडवतात. उलट जगातील आघाडीच्या कंपन्यांचे सीईओ पंतप्रधान मोदींच्या विचाराशी सहमत आहेत.

अमेठीमध्ये राहुल गांधी यांना पराभूत करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला. असे दिसते की, कॉंग्रेसचा खरा धोका वाढत आहे. कोणामध्ये युवराजांना काही सांगण्याची हिंमत नाही, अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधी यांचा समाचार घेतला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT