rahul gandhi
rahul gandhi Sakal
देश

''मोदी सरकारची निवडणूक ऑफर लवकरच संपणार; टँक फुल्ल करा''

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर न वाढवण्यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. याबाबत राहुल गांधी यांनी ट्वीट केले असून, यामध्ये राहुल गांधी यांनी जनतेला एक मोलाचा सल्ला देत केंद्र सरकारला टोला लगावला आहे. (Rahul Gandhi Corner Modi Government On Petrol Diesel Price )

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, जनतेने त्यांच्या गाडीच्या पेट्रोल टाक्या पूर्ण भरून घ्याव्या, कारण लवकरच मोदी सरकारची 'इलेक्शन ऑफर' संपणार असल्याचे म्हटले आहे. उत्तर प्रदेशसह (UP Assembly Election ) पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गेल्या काही आठवड्यांपासून वाढलेल्या नसून निवडणुका संपल्यानंतर त्या वाढतील, असा दावा काँग्रेसने (Congress ) केला आहे. सध्या कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवल्यास लिटरमागे 10 ते 12 रुपयांनी वाढ होऊ शकते, असेही अनेक अहवालांमध्ये म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या (Crud Oil) किमती दोन महिन्यांत वाढल्यामुळे, किरकोळ तेल कंपन्यांना खर्चाची पूर्तता करण्यासाठी 16 मार्च 2022 रोजी किंवा त्यापूर्वी इंधनाच्या किमती 12.1 प्रति लिटरने वाढवाव्या लागतील, असे ICICI सिक्युरिटीजने अहवालात म्हटले आहे. तेल कंपन्यांच्या मार्जिनचाही समावेश केला तर लिटरमागे 15.1 रुपये दरवाढ करावी लागू शकते. गुरुवारी आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये प्रति बॅरल 120 डॉलरचा टप्पा ओलांडला होता, जो गेल्या नऊ वर्षांतील सर्वोच्च आहे. तथापि, शुक्रवारी, याची किंमत प्रति बॅरल 111 डॉलरवर नोंदवण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Health Care : वाढत्या तापमानामुळे शरीरातील उष्णतेत होतेय वाढ, मूळव्याध अन् अ‍ॅसिडिटीसारखे आजार बळावण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT