Indian Railway Concession in tickets 
देश

Ministry of Railway : रेल्वेचा प्रवास आता स्वस्त होणार, रेल्वे मंत्रालय लवकरच भाड्यात सूट देण्याची शक्यता

कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षात रेल्वेच्या उत्पन्नात लक्षणीय घट झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षात रेल्वेच्या उत्पन्नात लक्षणीय घट झाली आहे.

सध्या यात्रेकरुंचा ट्रेन प्रवास सुखकर करण्याच्या विचारात रेल्वे मंत्रालय एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. (Ministry of Railway) रेल्वे मंत्रालयाकडून प्रवाशांना रेल्वे भाड्यात सूट देण्याचा विचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. याआधी सैनिक, खेळाडू, पत्रकार अशा काही श्रेणींच्या प्रवाशांना रेल्वे भाड्यात सूट दिली जायची. मात्र कोरोना काळात ही सूट देणं बंद केलं होतं. (railway ministry give to concession to passengers in tickets)

आता कोरोनाचा (Covid-19) धोका कमी झाला असल्याने रेल्वे मंत्रालयाकडून प्रवासी भाड्यातील सूट सुरु करण्याचा विचार आहे. ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात रेल्वे प्रवास पुन्हा केव्हा सुरु होईल असा प्रश्न संसदेत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना विचारण्यात आला आहे. यावर रेल्वे मंत्र्यांनी लेखी स्वरुपात उत्तर दिलं आहे.

यासंदर्भात रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं की, कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षात रेल्वेच्या उत्पन्नात लक्षणीय घट झाली आहे. गेल्या दोन वर्षात मिळालेले उत्पन्न 2019-20 आर्थिक वर्षातील उत्पन्नापेक्षाही कमी आहे. यामुळे रेल्वेवर मोठा आर्थिक परिणाम झाला आहे. कोरोनामुळे रेल्वेच्या उत्पन्नात मोठी घट झाली असताना तिकीटांवरील सवलतीचा परिणाम उत्पन्नावर होऊन वाईट परिणाम होईल. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सवलतीच्या तिकीटांची सेवा सुरु करणं सध्या शक्य नाही.

दरम्यान, कोरोनानंतर आता हळुहळू अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. येत्या काळात सकारात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास रेल्वे मंत्रालयाकडून पुन्हा सवलतीच्या तिकीटांची सेवा सुरु करण्याचा विचार आहे. रेल्वे भाड्यात सवलतींच्या मुद्द्यावरून विरोधकांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरलं होतं. सरकारला विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parel-Chinchpokli: ईद-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान राडा! धक्काबुक्की, दगडफेक अन् धार्मिक घोषणाबाजी; परळ-चिंचपोकळीत तणाव, Video Viral

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

Sangli Property Tax: घरपट्टीबाबत आज समितीची बैठकतालीम, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, रेडीरेकनरवर होणार चर्चा

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांचे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरू; २९ मागण्या पूर्ण होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

SCROLL FOR NEXT