Indaian railway. 
देश

मुंबईसह देशातील विविध ठिकाणांहून आणखी स्पेशल ट्रेन्स; जाणून घ्या शेड्यूल

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊनच्या काळात भारतीय रेल्वे  पूर्णपणे ठप्प झाली होती. कोरोनाची परिस्थिती पूर्वपदावर हळूहळू यायला लागल्यावर काही स्पेशल ट्रेन्स सुरु करण्याच्या निर्णय घेतला गेला. अद्याप  भारतीय रेल्वे पूर्णपणाने पूर्वपदावर आलेली नाहीये यादरम्यानच आता भारतीय रेल्वेने गुरुवारी आणखी 6 विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या पूर्णपणे राखीव असणार आहेत, अशीही माहिती भारतीय रेल्वेकडून देण्यात आली आहे.  सध्यातरी लॉकडाऊन आणि कोरोना साथीच्या दरम्यान रेल्वेने कोणत्याही नियमित गाड्यांची वाहतूक सुरू केलेली नाही. सर्व गाड्या विशेष पद्धतीने चालवल्या जात आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे वेळोवेळी विशेष गाड्यांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवत आहे. काल गुरुवारी उत्तर रेल्वेने आणखी 6 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या इंदूर-दिल्ली सराय रोहिल्ला, इंदूर-चंदीगड, इंदूर-उधमपूर, इंदूर-अमृतसर, वांद्रे टर्मिनल्स-हजरत निजामुद्दीन आणि मुंबई मध्य-नवी दिल्ली दरम्यान धावतील. 

या मार्गांवर विशेष रेल्वे गाड्या धावतीलप्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे इंदूर - दिल्ली सराय रोहिल्ला, इंदूर - चंदीगड, इंदूर - उधमपूर, संबंधीत लोकांना कळविण्यात आले असल्याचे लिहिले आहे. इंदूर-अमृतसर, वांद्रे टर्मिनल-हजरत निजामुद्दीन आणि मुंबई मध्य-नवी दिल्ली या मार्गावर विशेष गाड्या चालवतील. उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांच्या संदर्भात ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

या आहेत विशेष रेल्वे गाड्या 

09009/09010 मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली-मुंबई सेंट्रल दुरंटो सुपर फास्ट एक्स्प्रेस द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस विशेष ट्रेन

 09325/09326  इंदूर-अमृतसर-इंदूर द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन
02909/02910 बांद्रा टर्मिनस-हज़रत निज़ामुद्दीन-बांद्रा टर्मिनस गरीब रथ सुपर फास्ट आठवड्यातून 3 दिवस एक्सप्रेस विशेष ट्रेन

09337/09338 इंदूर-दिल्ली सराय रोहिल्ला-इंदूर साप्ताहिक विशेष ट्रेन
09307/09308-इंदूर-चंदीगड-इंदूर साप्ताहिक एक्सप्रेस विशेष ट्रेन
09241/09242 इंदूर-उधमपूर-इंदूर साप्ताहिक एक्सप्रेस विशेष ट्रेन
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT