raj Thackeray tweet on sammed shikharji issue Jain community objecting tourist status to Jain religious place  esakal
देश

Sammed Shikharji : वादग्रस्त प्रकरणावर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले; जैन धर्मियांना दिला पाठिंबा

सकाळ डिजिटल टीम

झारखंडमधील जैन समाजाचे (Jain Community) तीर्थधाम सम्मेद शिखर (Parshwanath Tirtha) पर्यटनस्थळ म्हणून केंद्र शासनानं घोषित केलं आहे. या निर्णयाचा जैन समाजाकडून जोरदार विरोध केला जातो आहे. यासाठी अनेक ठिकाणी आंदोलने देखील होत आहेत.दरम्यान जैन धर्मियांच्या मागण्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जैन बांधवांच्या मागणीशी पूर्ण सहमत असल्याचे म्हटले आहे. राज ठाकरे यांनी ट्विट केलं आहे.

राज ठाकरे म्हणाले की, "झारखंडमधल्या गिरीहीद जिल्ह्यातलं 'सम्मेद शिखरस्थळ' हे जैन धर्मियांचं पवित्रस्थळ आहे. ह्या धर्मस्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊ नये, कारण एकदा का ते पर्यटनस्थळ म्हणून घोषित झालं की तिथे जैन धर्माला मान्य नसलेल्या अनेक गोष्टी घडू शकतील अशी जैन बांधवांची भावना आहे."

हेही वाचा - ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

"महाराष्ट्र नवनिर्माण सेना जैन बांधवांच्या मागणीशी पूर्ण सहमत आहे. झारखंड सरकारने जैन धर्मियांच्या तीव्र भावनांचा विचार करून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, आणि हे होत नसेल तर केंद्र सरकारने ह्यात त्वरित हालचाल करावी." अशी मागणी देखील राज ठाकरे यांनी केली आहे.

सम्मेद शिखर अर्थात पारसनाथ पर्वतराज हे जैन समाजाचं तीर्थस्थळ आहे. इथं आजवर जैन समाजाचे 20 तीर्थंकर हे मोक्षाला गेले आहेत. जैन समाजाच्या दृष्टीनं सम्मेद शिखरला विशेष महत्त्व असताना केंद्र शासनानं या तीर्थस्थळाला पर्यटनस्थळ म्हणून घोषित केल्याच्या निर्णयास जैन समाजबांधव, आचार्य, साधू-साध्वी यांच्याकडून विरोध होत आहे. केंद्र सरकारनं हा निर्णय मागं घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मुंबईत ऐन दिवाळीत दुर्घटना, चाळीत आग लागून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघे जखमी

Nagpur Fraud: नागपूर शहरात घट्ट होतोय ‘डिजिटल अरेस्ट’चा विळखा; सेवानिवृत्त अधिकारी टार्गेट; ७५ लाखांपेक्षा अधिकची फसवणूक

Latest Marathi News Live Update : पुष्कर सिंह धामी यांनी दिवाळी निमित्त सहस्त्रधारा येथील माजरा गावातील आपत्तीग्रस्त रहिवाशांना फळांचे वाटप केले

उपोषणस्थळी भेटायला वेळ नाही, उपोषणकर्त्याला घरी बोलावून पाजला ज्यूस, शिंदेंच्या मंत्र्यांची असंवेदनशीलता

शाहिद आफ्रिदीने 'लायकी' दाखवली! अफगाणिस्तानला उपकाराची आठवण करून दिली ; म्हणतो, आम्ही तुम्हाला पोसतोय...

SCROLL FOR NEXT