Rajasthan Assembly Election Results 2023 esakal
देश

Rajasthan Assembly Election Results 2023 : राजस्थानात काँग्रेसचा दारुण पराभव; मुख्यमंत्री गेहलोतांनी राज्यपालांकडं राजीनामा केला सुपूर्द

काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी आज (रविवार) आपल्या पदाचा राजीनामा दिला.

सकाळ डिजिटल टीम

भारतीय जनता पक्षाला 106 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळालं आहे.

Rajasthan Assembly Election Results 2023 : राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी आज (रविवार) आपल्या पदाचा राजीनामा दिला. गेहलोत आज सायंकाळी राजभवनात पोहोचले आणि त्यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांच्याकडं मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला.

राजभवनच्या नियमानुसार, राज्यपाल मिश्रा यांनी तत्काळ प्रभावाने राजीनामा स्वीकारला आणि राज्यात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काम करत राहण्याचं आवाहन केलं.

विधानसभा निवडणुकीत राज्यातील 200 पैकी 199 जागांवर मतदान झालं. त्याचा निकाल आज लागला. भारतीय जनता पक्षाला 106 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळालं आहे. संध्याकाळी 6.45 वाजेपर्यंत त्यांचे उमेदवार नऊ जागांवर आघाडीवर आहेत. म्हणजेच, एकूण आकडा 115 वर पोहोचताना दिसत आहे. तर, काँग्रेस 69 जागांवर मर्यादित दिसत आहे. त्यांचे उमेदवार 60 जागांवर विजयी झाले असून नऊ जागांवर ते पुढे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात कारमध्ये प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे, नको त्या अवस्थेत सापडले; तरुणी लहान असल्यानं पोलिसांनी ताकीद देत सोडलं, VIDEO VIRAL

Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Latest Marathi Breaking News Live Update : पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या रेस्टॉरंट अँड बार मध्ये दरोडा

Aadhar Card Updates : आधारकार्ड मध्ये होणार मोठा बदल! नवीन आधार असणार अधिक सुरक्षित! जाणून घ्या काय होणार बदल

विदर्भातही बिबट्याची दहशत! नागपुरातील भांडेवाडी परिसरात वावर, वनविभागाचं पथक दाखल

SCROLL FOR NEXT