Rajasthan Assembly Election Results 2023
Rajasthan Assembly Election Results 2023 eSakal
देश

Rajasthan Assembly Election Results 2023 : गुर्जर समाजाची नाराजी, काँग्रेसला पडली भारी! त्याचवेळी सचिन पायलटांना मुख्यमंत्री केलं असतं तर..?

बाळकृष्ण मधाळे

भाजपनं काँग्रेसपेक्षा 1 ते 4 टक्के मतांची आघाडी मिळवली आहे. हे 2018 च्या विधानसभा निवडणूक निकालाच्या अगदी विरुद्ध आहे.

Rajasthan Assembly Election Results 2023 : गेल्या तीन दशकांपासून सुरू असलेला सत्ता परिवर्तनाचा ट्रेंड राजस्थान विधानसभा निवडणुकीतही कायम आहे. इथं काँग्रेस सत्तेपासून कोसो दूर असल्याचं ट्रेंडवरून स्पष्ट झालंय.

संपूर्ण राज्यातील काँग्रेस आणि भाजपच्या यशस्वी उमेदवारांचा आलेख पाहिला तर सर्वप्रथम लक्षात येतं ते म्हणजे, काँग्रेसबाबत विश्लेषक ज्या भीतीचं भाकीत करत होते, तेच घडलं आहे. सचिन पायलटांकडं (Sachin Pilot) दुर्लक्ष करणं काँग्रेसला चांगलंच महागात पडलं आहे. राजस्थान निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) 110 ते 115 जागांवर आघाडीवर आहे.

गुर्जर मतदार पुन्हा भाजपकडं वळला

ज्या भाजप समर्थक गुर्जरांनी सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या अपेक्षेनं गेल्या वेळी पक्षाकडं पाठ फिरवली होती, ते यावेळी एकतर भारतीय जनता पक्षात परतले आहेत किंवा काँग्रेसशी फारकत घेतली आहे.

मतांच्या टक्केवारीत भाजपची आघाडी

राजस्थानच्या निवडणूक निकाल/ट्रेंडवरून हे स्पष्टपणे दिसून येतं की, भाजपनं काँग्रेसपेक्षा 1 ते 4 टक्के मतांची आघाडी मिळवली आहे. हे 2018 च्या विधानसभा निवडणूक निकालाच्या अगदी विरुद्ध आहे. निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, राजस्थानमध्ये भाजपला सुमारे 41 टक्के मते मिळत आहेत. तर, काँग्रेसला सुमारे 38 ते 40 टक्के मतांसाठी संघर्ष करावा लागत आहे.

2018 मध्ये भाजप फार कमी फरकाने मागे

2018 मध्ये काँग्रेसला 39.8 टक्के मतं मिळाली आणि 200 आमदारांच्या सभागृहात बहुमताच्या आकड्यापासून 99 जागा दूर होती. तर, भाजपला किंचित कमी मतं मिळाली म्हणजे 39.3% आणि 73 जागा जिंकून विरोधी पक्षात राहिला.

गर्जरांनी बिघडवला होता भाजपचा खेळ

22 नोव्हेंबरलाच राजस्थानमधील गुज्जरांच्या काँग्रेसप्रती नाराजीचा अहवाल प्रसिद्ध केला होता. ही तीच गुर्जर व्होट बँक आहे, ज्यानं सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या अपेक्षेनं मागील वेळी पूर्व राजस्थानमध्ये (गुर्जरांचं प्राबल्य असलेल्या भागात) काँग्रेसला (अपक्ष, बसपासह) 39 पैकी 35 जागा दिल्या. वस्तुस्थिती अशी आहे की, गेल्या वेळी भाजपचे सर्व 9 गुर्जर उमेदवार पराभूत झाले होते. तेव्हा या भागात भाजपला केवळ 4 जागा मिळाल्या होत्या.

यावेळी गुर्जर भागात मतदानाचा ट्रेंड बदलल्याचं दिसून आलं. गुर्जर उमेदवार असलेल्या जागांवर जास्त मतदान झालं. इतर जागांवर मतदानाची टक्केवारी कमी झाली. गुर्जर मतदारांनी त्यांच्याच जातीतील उमेदवारांना झुकतं माप दिलं. त्यामुळंच बांदीकुई, दौसा, लालसोट, सिकराई, महुआ या जागांवर यावेळी कमी मतदान झालं. तर गुर्जर उमेदवार असलेल्या जागांवर जास्त मतदान झालं. या जागेवर भाजपच्या गुर्जर उमेदवाराला सर्वाधिक मतदान झालं, हेही वास्तव आहे.

कदाचित, यावेळी भारतीय जनता पक्षाला गुर्जर समाजाच्या भावनांची जाणीव निवडणुकीच्या खूप आधीपासून झाली असावी. त्यामुळंच त्यांनी दक्षिण दिल्लीचे खासदार आणि गुर्जर नेते रमेश बिधुरी यांना गुर्जर बहुल जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी म्हणून पाठवलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: मुंबईतील कुलाबा येथील मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था वाढवली

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान ते रोहित शर्मा IPL ब्रॉडकास्टरवर भडकला

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT