Narendra Modi, Amit Shah And Ashok Gehlot esakal
देश

पंतप्रधान मोदी व शहांना देशात शांतता नको आहे, अशोक गेहलोत यांची टीका

'ते आग लावण्यासाठी येतात'

सकाळ डिजिटल टीम

जयपूर : राजस्थानच्या करौळी जिल्ह्यात दुचाकी फेरीवर झालेल्या दगड फेकीनंतर घडलेल्या हिंसेत २७ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. याच दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. नड्डा यांच्या दौऱ्यावर राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी हल्लाबोल केला आहे.

गेहलोत म्हणाले, ते आग लावण्यासाठी येतात. देशभरात आग लावत आहेत. देश धोकादायक स्थितीतून जात आहे. त्यांच्याकडून संविधानाचा अपमान केला जात आहे. आम्हाला ही हिंदू असल्याचा गर्व आहे. आम्ही नाहीत का हिंदू ?, असा सवाल गेहलोत यांनी भाजपला (BJP) केला. (Rajasthan CM Ashok Gehlot Criticize PM Modi And Amit Shah Over Communalist In India)

महात्मा गांधींनीही म्हटले होते, की मला हिंदू असल्याचा गर्व आहे. आपापला धर्म सर्वांनी पाळावा आणि दुसऱ्यांच्या धर्माचा सन्मान करावा. त्यांनी (भाजप) लज्जास्पद काम केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुढे येऊन देशाला संबोधित करायला हवे आणि हिंसक घटनेची निंदा करायला हवी. कायद्याचे राज्य राहावे. हिंदू असो की मुस्लिम, जर तो समाजाची एकी बिघडवत असेल, तर त्यांना शिक्षा व्हायला हवी. कायद्याचे राज्य राहिल तेव्हाच लोक सुरक्षित राहतील, असे गेहलोत म्हणाले. दंगा घडवून आणणाऱ्यांना कधी इजा होत नाही. नेहमी निर्दोष लोकांचेच नुकसान होते. या देशात बंधूभाव राहिला तर आपण विकास करु शकू, असा विश्वास गेहलोत यांनी व्यक्त केला.

सर्वात मोठी जबाबदारी पंतप्रधान आणि अमित शहांची

मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, मोदी म्हणतात, की काँग्रेसमुक्त भारत करु. ७० वर्षांमध्ये आम्ही काय केले ? हे सर्व त्यांचे जुमले आहेत. आज देशात सर्वात मोठी जबाबदारी पंतप्रधान मोदींवर आणि अमित शहांवर आहे. त्यांनी देशात शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन करावे. आम्ही हिंसा सहन करणार नाही, असे त्यांनी म्हणावे. जर त्यांनी म्हटले, की भारत सरकार हिंसा सहन करणार नाही. त्यामुळे वातावरण शांत होईल. मात्र त्यांना हे नको आहे, अशी टीका गेहलोत यांनी मोदी व शहा यांच्यावर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नावडत्या भेंडीच्या भाजीवरून घर सोडले; आईशी घातला वाद; १७ वर्षीय मुलाने ट्रेनने गाठली दिल्ली

ENG vs IND,3rd Test: बुमराहने कॅच घेतला अन् सिराजने इंग्लंडच्या सलामीवीराच्या समोर जाऊन केलं आक्रमक सेलिब्रेशन; Video

Nagpur News: मान हॉटेलमधील कुंटणखान्यावर छापा; जबलपूर महामार्गावरील घटना, पीडितेची सुटका, ६० हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT