Vaibhav Gehlot Sakal
देश

राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाकडून नाशिकच्या व्यावसायिकाची फसवणूक? गुन्हा दाखल

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचा मुलगा वैभव गेहलोत (Vaibhav Gehlot) याच्यावर 6 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचा मुलगा वैभव गेहलोत (Vaibhav Gehlot) याच्यावर 6 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव गेहलोत याच्यासोबत राजस्थानमधील (Rajasthan) इतर 15 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या अशोक गेहलोत यांच्या मुलाचं नाव आल्याने पोलीस तपास करतील का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

नाशिकमधील एका व्यावसायिकाला राजस्थानच्या पर्यटन विभागाच्या ई-टॉयलेट जाहिरातीचे टेंडर देण्याच्या नावाखाली 6 कोटींचा गंडा घालण्यात आरोप (allegations) वैभव गेहलोतवर करण्यात आला आहे. स्वस्तात कंत्राट मिळवून देण्याच्या आमिषानं तरुण व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सुशील पाटील असं तक्रार करणाऱ्या व्यावसायिकाचं नाव असून ते नाशिकच्या गंगापूर रोड येथील रहिवाशी आहेत. 2018 ते 2020 या कालावधीत सुशील पाटील आणि इतर व्यावसायिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप वैभव गेहलोतवर केला आहे.

सुशील पाटील यांनी वैभव गेहलोत याच्यावर नाशिक पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दाखल केली त्यावेळी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली होती. परंतु त्यानंतर नाशिक जिल्हा कोर्टात दाद मागितली. कोर्टाच्या आदेशानंतर नाशिक पोलिसांनी वैभव गेहलोत याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नेमकी काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Satej Patil : मुख्यमंत्री फडणवीस सतेज पाटील यांच्या घरी, दोन्ही भावांना दिला आधार; डी. वाय. पाटील कुटुंबीयांचे सांत्वन

ODI World Cup मधूनच बाहेर होण्याची वेस्ट इंडिजवर पुन्हा टांगती तलवार, थेट एन्ट्री हुकली! काय आहे यामागचं गणित?

‘पँट वर करता येत नाही का?’ अभिनेत्रीचा लूक पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Viral Video

Marathi News Live Updates : कॉकरोच म्हणणाऱ्यांकडून डिग्री घेणं...; दीक्षांत सोहळ्याला सरन्यायाधीशांना बोलावल्याने विद्यार्थी संतापले

Nalasopara Accident: भारत पेट्रोलियमच्या गॅस वितरण वाहनाने दुचाकीस्वाराला उडवलं, तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT