Rajasthan Congress Crisis fir, union minister gajendra shekhawat , bhanwarlal sharma,sanjay jain
Rajasthan Congress Crisis fir, union minister gajendra shekhawat , bhanwarlal sharma,sanjay jain  
देश

आमदार फोडाफोडी प्रकरण: केंद्रीय मंत्र्यासह दोन आमदारांविरोधात FIR दाखल

सुशांत जाधव

जयपूर: Rajasthan Congress Crisis: राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन फोर्सने आमदार फोडोफोडीच्या आरोपानंतर केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत, आमदार भंवरलाल शर्मा आणि संजय जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेसने काही ऑडिए क्लिप समोर आणल्यानंतर स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपने (SOG) या प्रकरणाची दखल घेतली होती. गुरुवारी काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी आमदार भंवरलाल आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत  यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आमदार फोडाफोडीसंदर्भातील कथित ऑडिओ क्लिपमध्ये भंवरलाल, आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांचा आवाज असल्याचा थेट आरोप सुरजेवाला यांनी केला होता. गजेंद्र शेखावत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील काँग्रेसकडून करण्यात आली होती. एवढेच नाही तर चौकशी दरम्यान ते दोषी आढळल्यास त्यांच्या अटकेची कारवाई करावी, असेही काँग्रेसने म्हटले आहे. 

राजस्थानमध्ये  सचिन पायलट (Sachin Pilot) आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. सचिन पायलट यांच्या गटातील  भंवर लाल शर्मा आणि विश्वेंद्र सिंह यांचे प्राथमिक सदस्यत्व निलंबित करुन दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. एका कथित ऑडिओ टेपमधील आमदारांच्या फोनवरील बोलण्याचा मुद्दा पुढे करुन ही कारवाई करण्यात आली आहे. सचिन पायलट यांनी देखील समोर येऊन आपली बाजू मांडावी, असेही काँग्रेसने म्हटले आहे. 

अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वादानंतर राजस्थामध्ये सत्तांतर होणार का? अशी चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसने याठिकाणी ठाम भूमिका घेत सचिन पायलट यांना पदावरुन पायउतार करण्याचा निर्णय घेतला. बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेसे संख्याबळ असल्याचा दावाहीही मुख्यमंत्री गेहलोत यांनी केला असून सध्याच्या घडीला राज्यात सुरु असलेल्या संघर्षजन्य परिस्थितीत सरकारला कोणताही धोका नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT