electricity bill rajsthan in billion rupees
electricity bill rajsthan in billion rupees 
देश

अबबबबब; 3114154015 हे आहे महिन्याचं वीज बिल, दंडाचा आकडा बघाच!

सकाळ डिजिटल टीम

जयपूर - लॉकडाऊनच्या काळात वीजबीलांचा धक्का महाराष्ट्रातील अनेकांना बसला. यात गरीबापासून श्रीमंत अशा सर्वांचाच समावेश होता. काहींना कोट्यवधींचे बील आले तर काहींना शून्य रुपयांचेही बिल आहे. विज वितरण महामंडाळाच्या लॉकडाऊनमधील या कारभारामुळे मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना मानसिक त्रास सहन करावा लागला.

वीजबिल जास्तीजास्त किती येईल. हजार, लाख किंवा फारतर कोटीत. सर्वसामान्यांच्या वीजबिलात शे-पाचशे रुपयांमध्ये येणाऱ्या बिलात एखादा आकडा वाढला तरी हृदयाचे ठोक्यांचा वेग वाढेल. आताही एका ग्राहकाला असंच वीजबिल आलं आहे ज्यातले आकडे मोजून डोळे पांढरे होतील. लाख किंवा कोटींमध्ये नाही तर थेट अब्ज रुपयांचं हे बिल पाहून विजेच्या धक्क्यापेक्षा मोठा झटका ग्राहकला बसला नाही तर नवलच. 

राजस्थानमधील एका कंपनीला नेहमीचं लाइट बिल हे 10 ते 20 हजार रुपयांच्या आसपास येतं. मात्र यावेळी आलेल्या बिलाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. वीज देयकाच्या रकमेच्या चौकोनात 3114154015 हा आकडा पाहून कंपनीच्या संचालकांना मोठा धक्का बसला. आकडा पाहिल्यावर तो नेमका किती हेच कळायला वेळ जाईल.  बरं हे बिल भरण्यासाठीची मुदती फक्त 25 जानेवारीपर्यंत दिली आहे. जर हे बिल भरलं नाही तर यावर 5 कोटी 75 लाख रुपयांचा दंड आकारण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे. 

भिलवाडामधील डिझेल पॉवर इंटरनॅशनल कंपनीला गेल्या महिन्यात थोडंथोडकं नाही तर तब्बल 3 अब्ज 11 कोटी 41 लाख 54 हजार रुपयांचं बिल पाठवण्यात आलं आहे. हे बिल पाहताच कंपनीच्या संचालकांना धक्का बसला आहे. त्यानंतर संचालकांनी वीज वितरण कंपनीशी संपर्क साधला. त्यावेळी कॉम्प्युटरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे असं झाल्याचं त्यांनी सांगितलं. अखेर नवीन बिल कंपनीला पाठवण्यात आलं. त्यामध्येही 2 लाखांचा आकडा होता. वीज कंपनीच्या या कारभारावर संचालकांनी प्रश्न उपस्थित केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT