Girlfriend Boyfriend Sakal
देश

प्रेयसीच्या लॅपटॉपसाठी प्रियकराची करामत; तिघांना लुटलं!

यामध्ये या प्रियकराच्या एका मित्रानेही त्याला साथ दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

राजस्थानमधल्या कोटामध्ये एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला खूश कऱण्यासाठी एक अजब प्रकार केला आहे. हा प्रकार पाहून पोलिसही अचंबित झाले आहेत. आपल्या मित्रासोबत त्याने तीन जणांना चक्क लुटलंय. (Rajasthan man robbed 3 people for girlfriend)

या विचित्र स्वभावाच्या प्रियकराने एक डिलीव्हरी बॉय, पेट्रोल पंपावरचा कर्मचारी आणि एका भाजीवाल्याला लुटलं आहे. यामध्ये त्याने त्याच्या मित्राचीही मदत घेतली आहे. आपल्या प्रेयसीचा गहाण ठेवलेला लॅपटॉप सोडवण्यासाठी या तरुणाने चाकूचा धाक दाखवत अशा प्रकारे लूट केल्याची माहिती मिळत आहे.

एकाच दिवसात लागोपाठ झालेल्या तीन घटनांनंतर शहरात चांगलीच खळबळ माजली. पोलिसांनी तात्काळ ठिकठिकाणी नाकाबंदी केली आणि काही वेळातच या दोघांनाही ताब्यात घेतलं. या दोघांनीही लूट केल्यानंतर आपले कपडे बदलले. नाकाबंदीमधून बाईकवरुन निघण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी या दोघांनाही पकडलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma: One Last Time! रोहितने सिडनीतून केलं ऑस्ट्रेलियाला अलविदा, सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

Chhattisgarh Naxalite Surrender : छत्तीसगडमध्ये या वर्षांत तब्बल दोन हजारांहून अधिक नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण!

Latest Marathi News Live Update : मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून जोरदार पाऊस

Fraud Case: एपीएमसीत विमा फसवणूक प्रकरण उघड! नावसाधर्म्याचा गैरफायदा घेऊन पॉलिसी रक्कम लाटली

Prashant Kishor Challenges BJP : प्रशांत किशोर यांचं भारतीय जनता पक्षाला थेट आव्हान; म्हणाले, ''हिंमत असेल तर...''

SCROLL FOR NEXT