Murder, Suicide sakal media
देश

आधी मुलाला अन् बायकोला मारले, मग लावला गळफास; कुटुंब उध्वस्त

घरातील मृत महिलेच्या अंगावर जखम आढळल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

जयपूर : राजस्थानमधील एका व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मुलाला आणि पत्नीला मारल्याची घटना घडली आहे. सदर घटना ही राजस्थानातील सिकर मधील गौवाणी या गावात घडली आहे. सदर कुटुंब मुंबईत राहत असून ते होळीसाठी राजस्थानातील आपल्या जुन्या घरी आले होते. घरातील मृत महिलेच्या अंगावर जखम आढळल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

सदर घटना ही शनिवारी रात्री साधारण १०.३० च्या दरम्यान घडली आहे. स्थानिकांना शुक्रवारपासून सदर कुटुंबातील व्यक्ती न दिसल्याने हे प्रकरण उघडकीस आलं आहे. "आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा घर आतून लावलं होतं. आम्ही दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा एक मृतदेह घरातील फॅनला लटकताना आम्हाला दिसला आणि पलंगावर एका लहान मुलाचा आणि महिलेचा मृतदेह आढळला." असं सिकर परिसरातील नीम का ठाना सदर पोलिस स्टेशनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितलं.

"संपत कुमावत, पुजा कुमावत (वय. २४) आणि चिनु (२) असे मृतांचे नाव असून संपतने पहिल्यांदा त्याच्या पत्नीला आणि मुलाला मारले आणि त्यानंतर त्याने गळफास लावून आत्महत्या केली असं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. मृत महिलेच्या अंगावर जखम आढळून आलेली असून आम्ही घराला सील केलं आहे." असं पोलिसांनी सांगितलं.

अधिक माहिती देताना पोलिसांना सांगितलं की, सदर कुटुंब हे मुंबईत वास्तव्यास असून होळीसाठी ते गावी आले होते. मृत संपत हा मुंबईत नवीन घरातील फरशी बसवण्याचं काम करतो. या घटनेनंतर पूर्ण कुटुंब उध्वस्त झालं आहे. घटनास्थळी कोणतेही पुरावे जसे की, चिट्ठी सापडली नसून त्यांचे घरात भांडणही झाले नसल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली. तसेच घटनेचा तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT