Rajya Sabha elections Polling underway all eyes on results of Gujarat MP Rajasthan
Rajya Sabha elections Polling underway all eyes on results of Gujarat MP Rajasthan 
देश

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-भाजपमध्ये चुरशीची लढत

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- 19 जून रोजी देशातील 10 राज्यांमध्ये राज्यसभेच्या 24 जागांसाठी निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळत आहे. विशेष करुन गुजरात आणि राजस्थानमध्ये चांगलंच वातावरण तापलं आहे. एनडीएला राज्यसभेत बहुमत मिळवण्यासाठी  30 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजप अधिक जागा जिंकण्यासाठी जोर लावताना दिसत आहे. तसेच भाजप आपल्या आमदारांना फूस लावत असल्याचं म्हणत काँग्रेसने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये राज्यसभेच्या प्रत्येकी 4 जागांसाठी निवडणुका होत आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये दोन जागांसाठी निवडणुका होतील. झारखंड एक जागा, तर मेघालय, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि मिजोरममध्ये प्रत्येकी एका जागेसाठी निवडणुका होत आहेत. गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील एका जागेसाठी चुरस पाहायला मिळणार आहे.
---------
पिंपरी-चिंचवडमध्ये लोकप्रतिनीधींच्याही घरात शिरलाय कोरोना; नगरसेवकांनाही लागण
---------
घाबरु नका; तुमच्यासाठी इथे नोकरी उपलब्ध आहे; राज्य शासनाचा उपक्रम
---------
एनडीएकडे राज्यसभेच्या एकूण 245 जागांपैकी 91 जागा आहेत. तर यूपीएकडे 61 जागा आहेत. इतर पक्ष आणि अपक्ष यांच्या मिळून 68 जागा आहेत. आजच्या निवडणुकीत गुजरातमधून शक्ती सिंह गोहिल आणि भारत सिंह सोलंकी, मध्य प्रदेशमधून ज्योतिरादित्य सिंधिया आणि दिग्विजय सिंह हे मुख्य उमेदवार आहेत. 

गुजरातमध्ये काँग्रेस अडचणीत सापडला आहे. कारण मार्च महिन्यात काँग्रेसच्या 8 आमदारांनी राजीनामा दिला आहे. गुजरात भाजप चार जागांपैकी 3 जागा सहज जिंकण्याची शक्यता आहे. एका जागेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस दिसणार आहे. गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 182 जागा आहेत. त्यात काँग्रेसकडे 65 जागा आहेत. भाजपकडे 103 आमदार आहेत. खबरदारी म्हणून काँग्रेसच्या आमदारांना राजस्थान आणि अहमदाबादमधील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 22 आमदारांसह काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यामुळे राज्यातील काँग्रेस सरकार पडले होते.  राज्यातील तीन जागांपैकी काँग्रेसकडे एक तर भाजपकडे दोन जागा आहेत. मध्य प्रदेशमध्ये एकूण 230 विधानसभेच्या जागा आहेत. सध्या 206 आमदार विधानसभेत आहेत. यातील भाजपकडे 107 तर काँग्रेसकडे 92 जागा आहेत. राज्यसभेची जागा जिंकण्यासाठी उमेदवाराला 51 मतांची आवश्यकता आहे.  

राजस्थानमध्ये 3 जागांसाठी निवडणुका होणार असून यातील एक जागा भाजप तर 2 जागा काँग्रेसला मिळू शकतात. मात्र, भाजपने आपला एक अतिरिक्त उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे काँग्रेसला खबरदारी घ्यावी लागत असून रिसॉर्ट पॉलिटिक्सचा आधार घ्यावा लागत आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपने त्यांच्या आमदारांना 25 ते 30 लाखांचे आमिष दाखवल्याचा आरोप केला होता. मणिपूर काँग्रेसने निवडणुकीपूर्वी राज्यातील भाजप सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. भाजपचे 9 आमदार फितूर झाले आहेत. याचा प्रभाव राज्यसभेच्या एका जागेवर पडणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT