देश

‘मोदींवर विश्वास ठेवू नका’, असं सांगणारा डॅशिंग वकील

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : अनेक राजकीय आणि वादग्रस्त खटल्यांमध्ये वकिली करणारे भारतातील ख्यातनाम वकील राम जेठमलानी यांचे आज, सकाळी नऊच्या सुमारास निधन झाले. नवी दिल्ली येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून अनेकांनी दुःख व्यक्त केलंय.

काळ्यापैशांबाबतचे वक्तव्य गाजले
राम जेठमलानी स्पष्ट वक्ते म्हणून परिचित होते. अनेकदा त्यांची वक्तव्ये वादग्रस्त ठरली. त्यांच्यावर टीका झाली. पण, त्यांनी आपली मतं कधी बदलली नाहीत. अनेकदा त्यांची वक्तव्ये वर्तमानपत्रांच्या बातम्या झाल्या होत्या. त्यांनी अनेक राजकीय पक्षांसाठी, नेत्यांसाठी खटले लढले होते. सर्वच पक्षातील नेत्यांशी त्यांची चांगले संबंध होते. पण, भाजपमधील नेत्यांकडे त्यांचे थोडे झुकते माप होते. देशात २०१४मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आले. सत्तेवर येण्यापूर्वी मोदी आणि भाजप पक्षाने विदेशातील काळापैसा परत आणण्याची आश्वासने दिली होती. ती पूर्णत्वस न गेल्याने भाजप आणि मोदींवर टीका सुरू झाली होती. पण, मोदींवर थेट टीका करण्याचे धाडस सुरुवातीला जेठमलानी यांनी केले. २०१६मध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींविरोधात वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, ‘नरेंद्र मोदी यांची मदत केल्याबद्दल मी स्वतःला गुन्हेगार मानतो.’  

‘मोदींवर विश्वास ठेवू नका’
जुलै २०१६मध्ये राम जेठमलानी समाजवादी सिंधी समाजाच्या प्रादेशिक अधिवेशनाला उपस्थित राहिले होते. त्यातील जेठमलानी यांचे भाषण चर्चेत आले होते. ते मह्णाले, ‘नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यानंतर काळा पैसा परत आणू शकले नाहीत, याचे मला खूप वाईट वाटले. मला असे वाटते की मोदी आता आपले आश्वासन पूर्ण करणार नाहीत. मी मोदींची मदत केली होती. पण, आता मी त्यासाठी स्वतःला गुन्हेगार मानतो आहे. नागरिकांनी पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यांवर विश्वास ठेवू नये.’

वाजपेयी सरकारमध्ये मंत्री
राजकीय भूमिकेत कायम भाजपच्या जवळ राहणाऱ्या राम जेठमलानी यांनी केंद्रात मंत्रिपदेही भूषवली होती. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते दोन वेळा केंद्रीय कायदा मंत्री तर एकदा नगरविकास खात्याचे मंत्री होती. पाकिस्तानातील शिकारपूर येथे १४ सप्टेंबर १९२३ रोजी त्यांचा जन्म झाला होता. फाळणीनंतर जेठमलानी कुटंब भारतात स्थालांतरीत झाले होते. मंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचेही त्यांनी प्रतिनिधित्व केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Dattatraya Meghe Passes Away: लोकसेवेचा वटवृक्ष निमाला! माजी खासदार, लोकनेते दत्ता मेघे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, विविध क्षेत्रात हाेता दबदबा..

Pune Accident: पुण्यातील मुथाळणे घाटात शेतमजूरांची पिकअप पलटली; एक गंभीर तर १८ किरकोळ जखमी!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT