Narendra Modi Tweet Esakal
देश

Narendra Modi Tweet: श्रीरामाच्या भक्तीत मंत्रमुग्ध झाले पंतप्रधान मोदी; शेअर केला स्वाती मिश्रांच्या भजनाचा व्हिडिओ

Ram Mandir Inauguration: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारीला अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराचं उद्घाटन करणार आहेत. त्यापूर्वीच देशभरात उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये श्री राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचा भव्य सोहळा पार पडणार आहे. त्याची सर्व स्तरातून तयारी सुरू आहे. राम मंदिराबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. त्याआधी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी एक भजन शेअर करताना ते म्हणाले की, राम लाल्लाचे स्वागत करण्यासाठी हे एक मंत्रमुग्ध करणारे भजन आहे.

या भजनाची यूट्यूब लिंक शेअर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले की, "श्री राम लल्लाचे स्वागत करताना स्वाती मिश्रा यांचे हे भक्तिमय भजन मंत्रमुग्ध करणारे आहे..." स्वाती मिश्रा या बिहारच्या छपरा येथील रहिवासी आहेत. या भजनापूर्वी त्यांची छठी मैयावर गायलेली गाणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. त्याचवेळी त्यांचे हे भजनही चांगलेच व्हायरल होत असून अनेक जण सोशल मिडीयावर हे रील शेअर करताना दिसत आहेत.

स्वाती मिश्रा सध्या मुंबईत असून संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. या भजनापूर्वी त्यांना इतकी प्रसिद्धी मिळाली नसली तरी ते व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनीही त्यांचे भजन शेअर करून त्यांना प्रसिद्ध केले आहे.

मोदींनी राम भजन शेअर करण्याचे केले आवाहन

राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी मोदींनी राम भक्तांना श्री राम भजन हॅशटॅगसह भजन सोशल मीडियावर शेअर करण्याचे आवाहन केले होते. यानंतर त्यांनी स्वतः हे भजन शेअर केले. मन की बात या कार्यक्रमात देशाला संबोधित करताना ते म्हणाले होते, "माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी भगवान रामाशी संबंधित #SHRIRAMBHAJAN हा कॉमन हॅश टॅगसह कविता,भजन आदी सोशल मिडीयावर शेअर करा." (Modi appealed to share Ram Bhajan)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission PC: निवडणूक आयोगाचा राहुल गांधींवर जोरदार पलटवार! मतचोरीच्या आरोपांवरून म्हणाले...

पाळीच्या दिवसात मंदिरात न जाण्यावर कंगना रणौतचं स्पष्ट मत, म्हणाली, 'मला देवळात जावंसं वाटलंच नाही कारण...

'महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने जादूने 1 कोटी मतदार निर्माण केले, म्हणून भाजप युतीचा विजय झाला'; राहुल गांधींचा गंभीर आरोप

India Independence Day : विविध देशांमध्ये स्वातंत्र्यदिनाचा उत्साह; बीजिंगमधील कार्यक्रमात दोन चिनी नेत्यांची उपस्थिती

Crop Damage: फुलंब्री तालुक्यात ढगफुटीसदृश पावसामुळे मका, कपाशी व तूर पिकांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांची चिंता वाढली

SCROLL FOR NEXT