ramayan ram arun govil 
देश

बिझनेससाठी मुंबई गाठली; अभिनेता ते नेता रामायणातील रामाचा प्रवास

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - टीव्हीवर रामायण ही मालिका देशभर गाजली होती. या मालिकेत रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांना तर देशातील लोक प्रभू रामचंद्र मानून पुजाही करत होते. अभिनेते अरुण गोविल यांनी गुरुवारी भाजप प्रवेश केला आहे. आगामी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरुण गोविल यांचा प्रवेश मोठी घटना मानली जात आहे. अरुण गोविल भाजपकडून निवडणूक लढवण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. 

अरुण गोविल यांनी नुकतंच एका टीव्ही कार्यक्रमावेळी त्यांच्या आयुष्यातील खास गोष्टी सांगितल्या होत्या. रामायण मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अरुण यांनी मुंभईला आपण वेगळ्याच कारणासाठी आल्याचं सांगितलं होतं. यामध्ये ते म्हणाले की, मी मुंबईला अभिनय करण्यासाठी नाही तर बिझनेस करण्याच्या उद्देशाने आलो होते. अभिनयात येणं ही देवाची इच्छा होती. मी एकतर नोकरी केली असती किंवा बिझनेस केला असता. मात्र प्रभू रामचंद्रांना काही वेगळंच माझ्या आयुष्यात घडवायचं होतं. मला माहिती होतं की मी बिझनेससाठी परफेक्ट हे मात्र नंतर लक्षात आलं की हे क्षेत्र माझ्यासाठी योग्य नाही. अभिनयाची सुरुवात थिएटरमधून केली होती. 

1981 मध्ये हिट चित्रपटात काम
अरुण गोविल यांनी ताराचंद बडजात्या यांच्यासोबत 3 चित्रपट केले होते. त्यानंतर कनक मिश्रा यांच्या सावन को आने दो, विजय कपूर यांच्या राधा और सीत आणि सत्येन बोस यांच्या सांच को आंच क्या या चित्रपटांमधून अरुण गोविल यांनी काम केलं. कनक मिश्रा यांच्या जियो तो ऐसे जियो मध्ये त्यांनी 1981 मध्ये काम केलं होतं. 

रामायणाचे पुन:प्रसारण
अरुण गोविल यांचा जन्म 12 जानेवारी 1958 झाला होता. अरुण गोविल यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात चित्रपटापासून झाली. त्यांनी काही चित्रपट केले मात्र 1987-88 च्या काळात रामायणातील रामाच्या भूमिकेनं त्यांना ओळख मिळाली. या अभिनयाचं कौतुक देशभरात झालं. गेल्या वर्षी जेव्हा कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आलं तेव्हा सरकारने राष्ट्रीय वाहिनीवर पुन्हा रामायण प्रसारीत केलं. 

पहिल्यांदा मिळाला होता नकार
रामायणात ज्या भूमिकेनं अरुण गोविल यांना लोकप्रियता मिळाली त्यासाठी दिलेल्या ऑडिशनबाबत एका मुलाखतीत खुलासा केला होता. तेव्हा अरुण गोविल म्हणाले होते की, पहिल्यांदा जेव्हा ऑडिशन दिली तेव्हा रोल नाकारण्यात आला होता. मात्र नंतर त्यांना हा रोल मिळाल्याचा कॉल आला. 

सरकारी नोकरी करावी अशी वडिलांची इच्छा
गोविल यांचे वडील चंद्र प्रकाश गोविल हे सरकारी नोकरीत होते. मुलानंही सरकारी नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती. मात्र अरुण गोविल यांना असं काही करायचं होतं जे नेहमी लोकांच्या लक्षात राहिल. 6 भावंडांमध्ये ते चौथे होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास शासनाचे प्रोत्साहन

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT