ramdas athavale 
देश

Video: हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावर आठवले म्हणाले…

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित युवतीवर झालेल्या अत्याचाराचा व हत्येच्या अमानुष घटनेचा मी निषेध करत असून, हे अमानवीय कृत्य करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी, अशी मागणी केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ट्विटरवरून त्यांनी व्हिडिओ शेअर केला आहे.

हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेतील पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारवर सर्वचस्तरातून जोरादर टीका केली जात आहे. शिवाय, आठवले यांनी प्रतिक्रिया व्यक्त न केल्यामुळे त्यांच्यावरही टीका केली जात होती. पण, आठवले यांनी ट्विटरवरून व्हिडिओसह आपली प्रतिक्रिया देताना या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी केली आहे.

आठवले म्हणाले, 'उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात चंपा गाव आहे. त्या ठिकाणी १४ दिवस अगोदर एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. ती १९ वर्षांची होती. आता त्या मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना मानवतेला कलंक लावणारी घटना आहे. अतिशय वेदनादायी अशी ही घटना आहे. या घटनेचा मी निषेध करतो. पीडित मृत मुलीस व मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी  ३ ऑक्टोबर रोजी  मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटणार आहे. राज्यपालांची देखील भेट घेणार आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांना संरक्षण व आर्थिक मदत देखील मिळायला हवी. या प्रकरणास जलदगती न्यायालयात आणून सहा महिने किंवा एका वर्षांच्या आत या प्रकरणातील जे आरोपी आहेत, त्यांना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे. ज्या प्रकारे निर्भया हत्याकांडामधील आरोपींना फाशीची शिक्षा झाली होती. त्याप्रकारे ही देखील मोठी गंभीर घटना आहे. म्हणूनच या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, अशा प्रकारची मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मागणी करतो आहे. तसेच, सामाजिक न्याय मंत्रालयच्यावतीने देखील मी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो.'

'विविध ठिकाणी दलितांवर अत्याचार होत असून, ते रोखले पाहिजे. यासाठी सरकारच्यावतीने आम्ही नक्कीच प्रयत्न करू. राज्य सरकारांनी देखील दलितांना संरक्षण दिले पाहिजे. दलितांवरील अत्याचाराच्या घटना जागोजागी वाढत आहेत. ते कमी करण्यासाठी राज्य सरकारांनी पावले उचलायला हवीत. हाथरसमध्ये जी घटना घडली त्या घटनेचा मी पुन्हा एकदा धिक्कार करतो,' असेही आठवले म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT