Randeep Singh Surjewala And Narendra Modi esakal
देश

मोदी सरकार व भाजप राहुल गांधींना घाबरले कारण... : रणदीप सुरजेवाला

मोदी सरकार व भाजप राहुल गांधींना घाबरले

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : अखेर मोदी सरकार व भाजपच्या निशाण्यावर राहुल गांधी आणि काँग्रेस का आहे? ईडीची कारवाई काय जनतेचे प्रश्न उठवणाऱ्यांचा आवाज दाबण्याचे षडयंत्र आहे का? केवळ राहुल गांधी यांच्यावर इतके हल्लेखोर का आहेत? या प्रश्नांची उत्तरे देशाने जाणून घेणे आवश्यक असल्याचे काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी सांगितले. दिल्ली येथील पत्रकार परिषदेत ते आज मंगळवारी (ता.१४) बोलत होते. (Randeep Surjewala Says, Modi Government And BJP Fear Rahul Gandhi)

सलग दुसऱ्या दिवशी नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यामुळे काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मोदी सरकार व भाजप राहुल गांधी व काँग्रेसला घाबरतात कारण जेव्हा चीनने आपल्या भूभागावर नियंत्रण मिळविले आणि आमचे जवान शहीद झाले, तेव्हा पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) सर्वपक्षीय बैठकीत म्हणाले होते, की आपल्या भूभागात कोणीही घुसखोरी केलेली नाही आणि प्रवेश केलेला नाही.

त्यावेळी राहुल गांधी यांनी हा खोटेपणा ओळखला आणि देशासाठी आवाज उठवला, असे सुरजेवाला म्हणाले. महागाईने जनता त्रस्त आहे. त्यावरुन राहुल गांधी सतत सरकारला घेरत असून सरकारकडे उत्तर नाही. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर सरकार नाराज असल्याचा आरोप रणदीप सुरजेवाला यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT