मुंबई : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी गुरुवारी (ता.11) नवी दिल्ली येथे उच्च शैक्षणिक संस्थांसाठी “इंडिया रँकिंग 2020” चे आभासी पद्धतीने प्रकाशन केले. यामध्ये देशातील पहिल्या दहा विद्यापीठांच्या क्रमवारीत महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नवव्या क्रमांकावर येण्याचा मान मिळविला आहे. मुंबई विद्यापीठाने यंदा चांगली प्रगती केली असून 81 व्या क्रमांकवरून 61 व्या क्रमांकावर येण्याचा यशस्वी प्रयत्न मुंबई विद्यापीठाने केला आहे. त्याचप्रमाणे देशातील उत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या यादीत आयआयटी मद्रास पहिले असून आयआयटी मुंबई चौथ्या क्रमांकावर आले आहे.
देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठाने स्थान पटकावले असून पहिल्या शंभर विद्यापीठांच्या क्रमवारीत मुंबई विद्यापीठ 65 व्या स्थानावर पोहचले आहे. तर महाराष्ट्रातील पारंपारिक राज्य विद्यापीठांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रीय संस्थात्मक नामांकन (एनआयआरएफ) रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठाची कामगिरी सुधारली असून मागील वर्षी मुंबई विद्यापीठ 81व्या स्थानावर होते. विद्यापीठांच्या क्रमवारीसोबतच सर्वसाधारण क्रमवारीतही विद्यापीठाने मोठी मजल मारली असून 42.45 गुणांसह 95 व्या स्थानावर पोहचले आहे. गतवेळी सर्वसाधारण क्रमवारीत 101-150 या रँकिंग मध्ये मुंबई विद्यापीठाचे स्थान होते.
एकूण पाच वर्गवारीमध्ये विभागल्या गेलेल्या निकषांनुसार मुंबई विद्यापीठाला प्रत्येकी 100 गुणांपैकी टिचींग लर्निंग अँड रिसॉर्सेस (टीएलआर ) 48.08, रिसर्च अँड प्रोफेशनल प्रॅक्टिस (आरपीसी) 20.84, ग्रॅज्युएशन आऊटकम (जीओ ) 77.97, आऊटरिच अँड इन्क्ल्युजीवीटी (ओआय) 53.61 आणि पर्सेप्शन 23.79 असे गुण बहाल करण्यात आले असून एकूण 44 गुणांसह 65 व्या स्थानावर मुंबई विद्यापीठ पोहचले आहे.
ranking of universities in india IIT mumbai on fourth rank university of pune is in top 10
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.