Rape
Rape Sakal
देश

कोल्ड्रींक्समधून गुंगीचं औषध देऊन मित्राच्या बायकोवर बलात्कार

सकाळ डिजिटल टीम

मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना हरियाणात घडली आहे. मित्राच्या बायकोला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हरियाणातील पलवल येथील कॅम्प पोलीस ठाण्यांतर्गत एका महिलेला कोल्ड्रिंकमध्ये अंमली पदार्थ देऊन बेशुद्धावस्थेत बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. महिलेने तिच्या पतीच्या मित्रावर बलात्काराचा आरोप केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Rape of a friend's wife by giving her a narcotic from a cold drink)

तपास अधिकारी रेणू शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेने तक्रार दाखल केली आहे की, 9 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता ती तिच्या घरी एकटी होती. त्याचवेळी पतीचा मित्र पवन हा तिच्या घरी आला. पवनने तिला कोल्ड्रिंक्समधून गुंगीचं औषध दिले, त्यामुळे ती बेशुद्ध झाली.बेशुद्ध अवस्थेत, पवनने तिच्यावर बलात्कार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला, पीडितेने तिच्या पतीला हा सगळा प्रकार सांगितला आणि या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली.

याआधीही आरोपीने तिच्यावर दबाव टाकून बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली. आरोपीला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT