देश

राहुल गांधींच्या 'हिंदू आणि हिंदुत्व' वक्तव्यावर RSSकडून आली प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्याविषयी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे ज्ञान आणि संकल्पना अत्यंत हलक्या प्रतीची आहे, असे प्रत्यूत्तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी दिले. रा.स्व. संघाचा (Rashtriya Swayamsevak Sangh) पाठिंबा असलेल्या भारतीय ख्रिश्चन मंचच्या कार्यक्रमासाठी ते येथे आले आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असलेल्या इंद्रेश यांनी समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) प्रमुख अखिलेश यादव यांच्यावरही टीका केली. काशी विश्वनाथ कॉरीडॉरच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अखिलेश यांनी केलेल्या टिप्पणीचाही इंद्रेश यांनी समाचार घेतला. लोक जीवनातील अखेरचे क्षण काशीत घालविता, असे अखिलेश म्हणाले होते.

याबाबत इंद्रेश म्हणाले की, अखिलेश यांनी आपल्या विधानांद्वारे देशाला असभ्य बनवू नये. राजकारण्यांनी सर्वांविषयी तसेच एकमेकांविषयी आदर बाळगावा आणि आपल्या वक्तव्य तसेच वर्तनाद्वारे सभ्य समाज निर्माण करण्याचा ध्यास घ्यावा. अखिलेश सनातन धर्माचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

हिंदुत्वाशिवाय हिंदू मनुष्य म्हणून जगूच शकत नाही. या दोन व्याख्यांमध्ये फरक करून राहुल गांधी यांनी शरीरापासून आत्मा वेगळा काढला आहे. देवाने त्यांना सुबुद्धी द्यावी इतकीच प्रार्थना मी करतो, असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Crisis : मुंबईवर अभूतपूर्व पाणी संकट ! जलाशयांत केवळ १० टक्के पाणीसाठा; बांधकाम, जलतरणचा पाणीपुरवठा आजपासून बंद

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

PM Kisan 23rd Installment: 23व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली! 2,000 रुपये कधी खात्यात येणार? थेट कृषिमंत्र्यांनीच सांगितली तारीख

SC Reservation Subclassification : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत एक लाखांहून अधिक हरकती, सरकार घाईगडबडीत निर्णय घेणार नाही; मंत्री शिरसाट यांची ग्वाही

Satara Accident: दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याचे स्वप्न अधुरे! बनपुरीजवळ दुचाकी-पिकअपची समोरासमोर धडक; १६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT