Hathras stampede Esakal
देश

Hathras Stampede: 'या' निष्काळजीपणामुळे हाथरसमध्ये १२१ निष्पाप भाविकांनी गमावला आपला जीव; घटनेला जबाबदार कोण?

Hathras stampede: हाथरस दुर्घटनेत 121 जणांना जीव गमवावा लागल्यानंतर आता या अपघातामागील कारणे समोर येत आहेत. या 15 कारणांमुळे एवढी मोठी दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या गोष्टींची काळजी घेतली असती तर हा अपघात टाळता आला असता.

अंकिता खाणे (Ankita Khane)

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. सत्संग घेणारा 'भोले बाबा' या दुर्घटनेनंतर फरार आहे. दरम्यान, 80 हजारांच्या गर्दीसाठी आयोजकांनी परवानगी मागितल्याचे सांगण्यात येत आहे. आयोजकांनी ठरवलेल्या मानकांनुसार अनेक व्यवस्था केल्या पाहिजेत, ज्या सत्संगाच्या वेळी केल्या गेल्या नसल्याची माहिती समोर आली आहे.

या गोष्टी आल्या समोर

1. एक्झिट आणि एंट्री पॉइंट पूर्वी बनवलेले नव्हते.

2. मार्किंग करून पाइंट्स तयार केले होते . पण मार्किंग कुठेच दिसत नव्हते.

3. आपत्कालीन मार्ग बनवला गेला नाही.

4. 80 हजार लोकांसाठी वैद्यकीय पथक नव्हते.

5. वैद्यकीय पथक होते की नाही हा देखील तपासाचा विषय आहे.

6. किमान 5 रुग्णवाहिका असायला हव्या होत्या, त्यावेळी तिथे त्या नव्हत्या.

7. गर्दीनुसार कुलर आणि पंख्यांची व्यवस्था नव्हती.

8. गर्दीनुसार कमी स्वयंसेवक होते.

9. प्रशासनाने तैनात केलेला फौजफाटा नगण्य होता.

10. खाण्यापिण्याची योग्य व्यवस्था नव्हती.

11. ज्या रस्त्यावरून बाबांचा ताफा गेला त्या रस्त्यावर कोणतेही बॅरिकेडिंग नव्हते.

12. आयोजकांनी घेतलेल्या परवानगीमध्ये सर्व गोष्टींचा उल्लेख नव्हता.

13. संपूर्ण शेताचे सपाटीकरण करून किमान 10 एकर जमीन सपाट करणे आवश्यक होते, ते केलेले नव्हते.

14. शेताच्या सभोवताली प्रवेशाचे रस्ते बांधले जाणार होते, पण ते बांधले गेले नाहीत. फक्त एक छोटासा कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता.

15. परवानगी घेणे आणि देणे या दोन्ही बाबतीत मोठ्या प्रमाणावर निष्काळजीपणा होता.

बाबा आपल्या सुरक्षेसाठी पुरुष आणि महिला रक्षक ठेवतो. त्याने आपल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या टीमचे नाव नारायणी सेना ठेवले आहे. ही सेना बाबाची आश्रमापासून ते प्रचारस्थळापर्यंत सेवा करते. भोले बाबा आपल्या सेवकांनाच आपल्या संरक्षणात ठेवतो. सर्व्हिसमन फक्त एक प्रकारचा ड्रेस कोड घालतात.

बाबांसाठी तयार करण्यात आला होता वेगळा मार्ग

भोले बाबांच्या सत्संगात संपूर्ण व्यवस्था सेवकांच्या हातात असते. काही शिष्य पोलिसांचेही आहेत, त्यांच्यापैकी काही जण प्रवचनाला संधी मिळताच येत असत. बाबाला प्रवचनस्थळी जाण्यासाठी स्वतंत्र मार्गही तयार करण्यात आला होता. या मार्गावरून फक्त बाबाचा ताफा जाणार होता. याशिवाय कोणालाही जाऊ दिले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : केडीएमसीच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी मतमोजणी

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT