pm narendra modi.jpg 
देश

Corona Vaccine सर्टिफिकेटवरील मोदींचा फोटो हटवा, निवडणूक आयोगाचा आदेश

सकाळ डिजिटल टीम

कोलकाता- निवडणूक आयोगाने कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र हटवण्याचे आदेश दिले आहेत. प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचे छायाचित्र असणे हे निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) तक्रारीनंतर आयोगाने हा आदेश दिला आहे. ज्या चार राज्यांत आणि केंद्र शासित प्रदेशात निवडणूक होणार आहे. तिथे कोविड प्रतिबंधक लस दिल्यानंतर वितरित केल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रावरील छायाचित्र काढण्यात आले की नाही हे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पाहावे, असे निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे. 

निवडणूक आयोगाने म्हटले की, छायाचित्रे आचारसंहितेचे उल्लंघन करतात. त्याचबरोबर आरोग्य मंत्रालयाने आदर्श आचारसंहितेचा स्तर एका स्तरावर सुनिश्चित करावा असेही सांगितले. निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांच्या तक्रारीनंतर आरोग्य मंत्रालयाला स्पष्टीकरण मागितले होते. 

आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, लसीकरण प्रणालीला निवडणुकांच्या घोषणेआधी डिझाईन केले होते. त्यामुळे प्रमाणपत्र त्यानुसार देण्यात येत होते. आचारसंहिता नंतर लागू झाली आहे. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीसाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान कार्यक्रम जाहीर केला होता. 

भारताने 1 मार्चला लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात केली आहे. यामध्ये 60 वर्षांहून अधिक आणि ज्यांना गंभीर आजार आहे अशा 45 पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना दुसऱ्या टप्प्यात लस दिली जात आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT-Sawantwadi Express : स्वच्छतागृहात सांडपाणी अन् फुटलेल्या काचांवर पुठ्ठे; सावंतवाडी एक्स्प्रेसच्या पहिल्याच प्रवासातील दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल, ट्रेनमधील धक्कादायक वास्तव समोर

Parbhani food Safety Raid: परभणीत अन्न सुरक्षा विभागाचा छापा; पेढीचा परवाना निलंबित, २१५ किलो मिल्क पावडर जप्त

Marathi News Live Updates : राणे कुटुंबीयांच्या जुहूतील घरी गणपती बाप्पाचे उत्साहात आगमन

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

SCROLL FOR NEXT