Repos Energy Mobile Petrol Pump: सध्या प्रत्यक्ष जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन खरेदीकडे लोकांचा कल वाढत आहे. कपडे, सौंदर्यप्रसाधने, स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गृहोपयोगी वस्तू एवढेच काय तर जेवण आणि औषधंसुद्धा लोक ऑनलाईन ऑर्डर करतात. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झोमॅटो अशा कंपन्या आपल्या ग्राहकांना या गोष्टी घरपोच (Home Delivery) देत असतात. परंतु डिेझेलसुद्धा कधी ऑनलाईन मिळू शकेल, याचा विचार तुम्ही केलाय का? परंतु पुण्यातील एका दांपत्याने डिझेलची होम डिलीव्हरी देण्याचं एक अनोखं स्टार्टअप सुरु केलं आहे. (Repos Energy, a company based in Walunj Dapatya, Pune, provides diesel home delivery.)
चेतन वाळुंज (Chetan Valunj) आणि आदिती भोसले (Aditi Bhosale) असं या दांपत्याचं नाव असून त्यांची 'रिपोज एनर्जी' (Repos Energy) ही कंपनी डिझेल घरपोच (Home Delivery of Diesel) देण्याची सोय करते. आदिती यांनी फॉरेन्सिक आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात शिक्षण घेतले असून चेतन आपल्या घरचा पेट्रोल पंपाचा व्यवसाय पुढे चालू ठेवलाय. पुण्यातील खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे रतन टाटा यांच्या पाठिंब्याने वाळुंज कुटुंबाने उभारलेल्या रिपोज एनर्जी या कंपनीला यावर्षीचा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कारदेखील मिळाला आहे.
दिवसभर काम करून पुन्हा पेट्रोलपंपावर इंधन भरण्यासाठी जायचं, तिथेही लांबच लांब रांगात वेळ घालवणे अतिशय कंटाळवाणं असते. मालवाहतूक करणारी वाहने तसेच शहरापासून दूरवर काम करणाऱ्या ट्रॅक्टर किंवा मग जेसीबी, क्रेन इत्यादी गोष्टी असणाऱ्यांनाही या परिस्थितीला सामोरं जावं लागते. पेट्रोल पंपांवरून अशा ठिकाणी इंधन नेईपर्यंत ते मोठ्या प्रमाणात वाया जाते. हे वाया जाणारं इंधन तसेच वेळ या इंधानाची योग्य प्रकारे त्याची वाहतूक केली तर हा वाया जाणारं इंधन तसेच वेळ वाचवता येऊ शकतो हा विचार या दांपत्याच्या डोक्यात आला.
त्यांच्या या स्टार्टअप ची दखल दस्तुरखुद्द रतन टाटा (Ratan Tata) यांनी देखील घेतली आणि या दोघांनाही चर्चेसाठी आमंत्रित केले होते. रतन टाटा यांनी त्यांच्या या प्रकल्पासाठी मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले आहे.
त्यातून त्यांनी‘रिपोज एनर्जी’ हा स्टार्टअप सुरु केला. या ब्रँडच्या माध्यमातून ‘डेड मायलेज’ची एक दुर्लक्षित समस्या सोडवण्याचे काम ते करतात. वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी इंधन स्टेशनवर जाण्याचा वेळ वाचावा आणि त्यातून सुटका व्हावी या उद्देशाने या दोघांनी डिझेलची होम डिलिव्हरी सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी एक यंत्रणासुद्धा तयार केली आहे. सध्या त्यांच्या कंपनी मध्ये सध्या ३०० हून अधिक लोकं काम करतात. इतकेच नाही तर त्यांचा व्यवसाय आता १८८ पेक्षा जास्त शहरात कार्यरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.