देश

Republic TV: ट्रेडमार्क उल्लंघन!; रिपब्लिक टिव्हीचा तेलुगू चॅनेलविरोधात १०० कोटींचा दावा

रिपब्लिक टिव्हीनं दावा केला आहे की संबंधित चॅनेलनं त्यांचा ट्रेडमार्क कॉपी केला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : न्यूज चॅनेल रिपब्लिक टिव्हीनं तेलगू चॅनेल RTV न्यूज विरोधात मुंबई हायकोर्टात दावा दाखल केला आहे. चॅनेलच्या लोगो अर्थात ट्रेडमार्कविरोधात हा दावा असून लोगो कॉपी केल्याचा आरोप करत रिपब्लिक टीव्हीनं १०० कोटी रुपयांचा नुकसान भरपाईचा दावा केला आहे. पण या विषयावर तातडीनं सुनावणी घेण्यास एकल खंडपीठाचे न्या. मनिष पितळे यांनी नकार दिला. (Republic TV moves Bombay High Court against Telugu channel RTV News)

आरटीव्ही न्यूजनं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडं लोगो बदलण्यासाठी परवानगी मागितल्याची माहिती हायकोर्टात दिली. RTV ची होल्डिंग कंपनी Rayadu Vision Media नं कोर्टाला सांगितलं की, आम्ही सादर केलेला अर्ज मंत्रालयात प्रलंबित आहे. रिपब्लिक टीव्हीनं औपचारिकरित्या लोगोला विरोध केला होता ज्यावर मंत्रालयानं अद्याप मत प्रदर्शित केलेलं नाही. हा युक्तीवाद पाहता न्या. पितळे यांना तातडीन सुनावणीस नकार दिला.

दरम्यान, कोर्टानं यांसदर्भात आदेश दिले की, “आत्तापर्यंत रायडूनं त्यांचा बदललेला लोगो वापरण्यास अद्याप सुरुवात केलेली नाही. ही बाब लक्षात घेता 05 जून 2023 रोजी अंतरिम सुनावणीसाठी विचार करता येईल. तसेच खंडपीठानं पक्षकारांना तातडीच्या सुनावणीसाठी सुट्टीतील खंडपीठासमोर याचिका दाखल करण्याचं स्वातंत्र्यही दिलं आहे.

१०० कोटींचं नुकसान झाल्याचा दावा

ARG Outlier रिपब्लिक टीव्हीच्या मुळ कंपनीनं कोर्टात मार्च 2023 मध्ये दावा दाखल केला होता की, रिपब्लिक टीव्हीच्या मालकीच्या ट्रेडमार्क 'R'चं उल्लंघन केल्याबद्दल रायुडूच्या विरोधात कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी. रायडूच्या या अनुचित व्यापार पद्धतीमुळं रिपब्लिक चॅनेलचं १०० कोटी रुपयांचं नुकसान झाल्यानं याची भरपाई मिळावी असंही या याचिकेत म्हटलं आहे.

रिपब्लिक टीव्हीचा आरोप काय?

याचिकेत म्हटलं आहे की, 4 फेब्रुवारी 2023 मध्ये रिपब्लिक टीव्हीला RTV नावाचं YouTube चॅनेल आलं. रिपब्लिक टीव्हीनं आपल्या दाव्यात आरोप केला की, रायडूनं त्यांचा ट्रेडमार्क कॉपी केला आहे आणि ते जो लोगो वापरत आहेत तो रिपब्लिकच्या लोगोसारखाच दिसतो आहे. प्रतिवादी रायडूनं प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर देताना सांगितलं की, ते 2007 पासून 'RTV' लोगो वापरत आहेत. रायडूनं असंही म्हटलं की, रिपब्लिक टीव्ही सुरु होण्यापूर्वीपासून ते 'RTV' हा शब्द वापरत होते, जो फक्त 2016 मध्ये समाविष्ट करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : राज्यात वादळी पावसाचा इशारा; आज 'या' जिल्ह्यांत गारपीट होण्याची शक्यता

Gadchiroli News: रेकाॅर्डवरील शेवटच्या माओवाद्याला परतीची साद; लोकशाही मार्ग स्वीकारण्याचे आवाहन; डाव्या पक्षांच्या नेत्यांनी घेतली कुटुंबाची भेट

Donald Trump Speech: आता तुम्ही तुमचं बघा... ट्रम्पने केले हात वर, होर्मुझवरुन इतर देशांना दिला सल्ला! तेलाचा प्रश्न पेटणार

Kolhapur fire news : कोल्हापुरातील फुलेवाडी रिंगरोडवरील सुपर बाजारला भीषण आग; मोठे नुकसान

Akola News: दहा हजार रुपये देतो, तुझी मुलगी पाठव; लॉकअपमधील महिला आरोपीला मागणी, एएसआय निलंबीत

SCROLL FOR NEXT