Kerla High Court Sakal
देश

Kerala High Court: पतीने संमतीविरुद्ध लैंगिक संबंध ठेवल्यास पत्नीला घटस्फोटाचा अधिकार; न्यायालयाचा मोठा निर्णय!

एका प्रकरणात पत्नीने पतीवर क्रूरतेचा आरोप करत केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अमित रावल आणि सीएस सुधा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

Sandip Kapde

Kerala High Court: पतीने पत्नीच्या संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवले तर पत्नीला घटस्फोटाचा अधिकार आहे. तसेच हे लैंगिक छळ करणे मानसिक आणि शारीरिक कौर्यासारखे असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत पत्नीला घटस्फोट देण्याचा अधिकार असल्याचे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे. लैंगिक विकृतीबद्दल लोकांच्या वेगवेगळ्या धारणा आहेत, जर प्रौढांनी स्वत:च्या इच्छेने आणि संमतीने लैंगिक कृत्ये केली तर न्यायालय हस्तक्षेत करत नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

एका प्रकरणात पत्नीने पतीवर क्रूरतेचा आरोप करत केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अमित रावल आणि सी एस सुधा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

प्रत्येक व्यक्ती लैंगिकदृष्ट्या कृत्यांची व्याक्या वेगवेगळ्या प्रकारे करु शकते. मात्र जर जोडीदाराने लैंगिक संबंधास संमती नसतानाही संबंध ठेवल्यास त्यावा क्रूरता म्हटले जाईल. नातेसंबंधात एकाने दुसऱ्याच्या वागणुकीवर आक्षेप घेतला तरीही दुसरा पक्ष संबंध निर्माण करतो. तर त्याला शारीरिक दोन्ही प्रकारे क्रूरता म्हटले जाईल. नात्यात एखाद्याचे आचरण आणि चारित्र्य पती किंवा पत्नीच्या दुःखाचे कारण बनले तर घटस्फोटाचे कारण ठरू शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे. (High Court News)

महिलेने कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशांना आव्हान देणाऱ्या दोन याचिकांवर निर्णय दिला आहे. एका महिलेने दोन याचिका दाखल केल्या होत्या. अर्जदार पती-पत्नीचे 2009 साली लग्न झाले होते. लग्नाच्या 17 दिवसानंतर नवरा कामानिमित्त बाहेर देशात गेला. पत्नीचा आरोप केला आहे की, जेव्हा पती 17 दिवस तिच्यासोबत होता, तेव्हा त्याने तिला अश्लील चित्रपट दाखवून त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. पत्नीने नकार दिल्याने पतीने तिचे शारीरिक अत्याचार केले. पतीने पत्नीचे सर्व आरोप फेटाळले आणि तिला खोटे म्हटले. घटस्फोट घेण्यासाठी हे सर्व आरोप केले जात असल्याचे पतीने सांगितले. (Latest Marathi News)

हायकोर्टाने प्रथम अपील कोर्टात संपर्क साधला होता, जिथे पतीने 2017 मध्ये वैवाहिक हक्क पुनर्संचयित करण्यासाठी याचिका दाखल केली होती. यावेळी कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाची याचिका फेटाळून लावत वैवाहिक हक्क बहाल करण्यास परवानगी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT