Priyanka gandi rita yadav 
देश

कॉंग्रसचे तिकीट मिळण्यासाठी 'तिने' स्वत:वर झाडली गोळी!

पोलिसांनी रिटा यादवसह तिघांना अटक केली आहे

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुल्तानपूर येथे १६ डिसेंबरला झालेल्या सभेत रिटा यादवने काळे झेंडे दाखवले. त्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या रिटाने काँग्रेसकडून तिकीट मिळवून देण्यासाठी स्वतःवर गोळीबार केला होता. या घटनेचा खुलासा करत पोलिसांनी गोळीबारात सहभागी असलेल्या दोन आरोपींसह रिटाला अटक केली.

सुल्तानपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना काळे झेंडे दाखविणाऱ्या महिलने प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी स्वत:वरच गोळीबार केल्याचे उघड झाले आहे. कॉंग्रेस पक्षाकडून तिकीट मिळावे, स्वत:चे महत्व वाढावे, म्हणून तीने हे कृत्य केले आहे. प्रियंका गांधींकडून (Priyanka Gandhi) आजच उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या वतीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे.यामध्ये 50 महिलांना संधी देण्यात आली आहे.

चांदा कोतवाली भागातील लालू का पुरा सोनवन गावातील रहिवासी रिटा यादव (३५) पंतप्रधान नरेंद्र मोदी जिल्ह्यातील अर्वलकिरी रॅलीत पोहोचले तेव्हा प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. रिटा यादव यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले होते. यानंतर रीता यादव यांनी अमेठीमध्ये प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 3 जानेवारी रोजी रिटाने पोलिसांत धाव घेत आपल्यावर अज्ञातांनी हल्ला केल्याचे सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यावर खरे प्रकरण उघडकीस आले.

केले स्वत:वरच फायरिंग

3 जानेवारी रोजी रीटा यादव जीपने शहरात गेल्या होत्या. घरी परतत अशताना वाटेत तीन दुचाकीस्वारांनी जीपला ओव्हरटेक करून तिला थांबवल्यानंतर रिटा यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळी रिटा यांच्या पायाला लागली होती. पोलिसांकडे तक्रार करत तिने गुन्हा दाखल केला होता. कॉंग्रेसनेही या मुद्याचं राजकारण करत योगी सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांच्या माहितीनुसार, रिटाने मोहम्मद मुस्तकीम, सूरज यादव रा. मानापूर, माधव यादव यांच्या सहकार्याने स्वत:वर गोळी झा़डली. रिटाबरोबर ते गाडीत होते. त्यानंतर फरार झाले. पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा केल्यानंतर रिटासह तिघांना अटक केली आहे. आरोपींकडून हत्यारं जप्त करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Navy: नववर्षात नौदलाचे सामर्थ्य वाढणार! ‘तारागिरी’, ‘अंजदीप’ युद्धनौका लवकरच सेवेत

Success Story Women Farmers : कोल्हापूर जिल्ह्याच्या शेतीतही महिलाराज; उद्योजकतेचा दिला साज

Latest Marathi News Live Update : स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मारकारच देवेंद्र फडणवीस करणार लोकार्पण

Save Tigers: धक्कादायक! देशात १६९ तर राज्यात ४१ वाघांचे मृत्यू; मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ४५ वाघांचे अधिक बळी..

Sinnar Accident : मोहदरी घाटात काळजाचा थरकाप! कंटेनरने समोरून येणाऱ्या वाहनांना चिरडले; तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT