Riyasatkar Birth Anniversary
Riyasatkar Birth Anniversary esakal
देश

Riyasatkar Birth Anniversary : रिडर ते रियासतकार; गो. स. सरदेसाईंचा लेखन प्रवास....

सकाळ डिजिटल टीम

Riyasatkar Birth Anniversary : इतिहासकार - गो. स. सरदेसाई. अर्थात एस.जी.सरदेसाई. म्हणजेच प्रसिध्द रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई. सयाजीराव महाराज गायकवाड हे रत्नपारखी होते. महाराष्ट्रातील उत्तमोत्तम विद्वान व हुशार व्यक्तींना ते आपल्या संस्थानात विविध पदांवर कार्यरत करीत असत. व त्यांच्या अंगभूत गुणांना बहरण्याला, फुलण्याला वाव देत असत.

रत्नागिरी जिल्ह्यातील गोविल गावातून असेच एक रत्न महाराजांना हाती लागले होते. इ. स. १९८८ साली मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून बी. ए. झालेले गो. स. सरदेसाई हे एका गरीब कायस्थ शेतकऱ्याचे भुमीपुत्र होते. बालपण गावी शाळा शिकतांना शेतीत कष्टात गेले होते.

बी. ए. झाल्यावर एका हितचिंतकाच्या शिफारशीवरुन बडोद्याला पोहचले व सयाजीराव महाराजांचे रिडर म्हणून कामाला लागले. रोजचे पेपर, मासिके, घडामोडी वाचून दाखवणे हे त्यांचे कार्य होते. महाराजांना रोजच्या रोज जगातल्या घडामोडी अवगत करुन देतांना प्रचंड असा माहितीचा साठा त्यांच्या ठायी जमा झाला होता.

महाराजांचे रिडर म्हणून काम करतांनाच युवराज फत्तेसिंग राव गायकवाड यांना व इतर राजकुमार व राजकन्यांना शिकवण्याचे कामही त्याच्याकडे सोपविण्यात आले होते. या नव्या कामगीरीसाठी ते मनापासून सिध्द झाले होते. त्यासाठी ते शिकवण्याच्या विषयाची जी टिपणे काढीत, ती टिपणे इतकी विस्तृत व प्रभावी असत की, त्यातून पुढे मराठी रियासतीचा जन्म झाला झाला होता.

या टिपणातून सरदेसाईंनी १८९८साली ' मुसलमानी रियासत' हा प्रथम ग्रंथ लिहिला. साधारणतः चोवीस वर्ष सरदेसाई महाराजांच्या सर्व मुलांचे मास्तर होते. या काळात त्यांनी, मुलांना शिकवण्याच्या नोटस् एवढ्या सखोल तयार केल्या होत्या की, त्याआधारे सरदेसाईंनी लवकरच दुसरा एक ग्रंथ लिहून हातावेगळा केला होता.' ब्रिटिश रियासतीचा पुर्वाध ' असे त्या ग्रंथाचे नाव होते. हे दोन्ही ग्रंथ 'सयाजीराव महाराज ग्रंथमाला' या मालेद्वारा प्रसिध्द झाले होते.

पुढे वयाच्या साठाव्या वर्षी ते महाराजांच्या सेवेतून सेवानिवृत्त होऊन नंतरचे उर्वरित आयुष्य लोनावळ्या जवळच्या कामशेत या गावी इंद्रायणी नदीकाठी एक घर बांधुन तेथे व्यतित केले होते.

'मराठी रियासती'चे सर्व तेरा खंड त्यांनी कामशेतला बसून लिहिले होते. या काळात त्यांची मैत्री दुसरे एक प्रसिध्द इतिहासकार सर यदुनाथ सरकार यांच्याशी झाली होती. या मैत्रीतून सरदेसाईंकडे ' पेशवे दप्तर', रेसिडेन्सी रेकाॕर्डस, ग्वाल्हेरचा पत्रसंग्रह इ. विषयांवर लेखन घडून आले होते. व महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच वा. सी. बेंद्रेंप्रमाणे तठस्थ लेखन या महान रियासतकारांच्या हातून कागदावर उतरले होते. या लेखनन कार्यात सरदेसाईंना यदुनाथ सरकारांचेही बहुमुल्य सहकार्य लाभले होते.

यदुनाथ सरकारांनाही 'मराठ्यांचा इतिहास' लिहितांना सरदेसाईंच्या टिपणांची व ज्ञानाची भरघोस मदत झाली होती. यदुनाथ सरकारांना माराठ्यांचा इतिहास लिहितांना काही कुटप्रश्न उपस्थित झाले तर, त्यावेळी सरदेसाई आपले ज्ञान व ऐतिहासिक माहितीच्या आधारे त्या कुटप्रश्नाची सोडवणूक करीत असत.

गो. स. सरदेसाई यांनी रियासतीचे एकुण तेरा खंड प्रसिध्द केले होते. त्याशिवाय 'मुसलमानी रियासतीच्या' तीन आवृत्या त्यांनी काढल्या होत्या. पेशवे दप्तरांच्या कागदपत्रांवर लेखन व संपादन करुन त्यांचे ४५ खंड सरदेसाईंनी प्रकाशित केले होते. त्याशिवाय यदुनाथ सरकारांबरोबार 'पुना रेसिडेन्सी काॕरस्पाॕन्डन्स' चे पाच खंड संपादित केले होते. या व्यतिरिक्त मामा परमानंदांचे दिर्घ काव्य 'अनुपुराण' याचे संपादनही गो. स. सरदेसाईंनी करुन त्यांनी ते 'गायकवाड ओरिएंटल सेरीज' मध्ये प्रकाशित केले होते.

रियासतकारांनी लहान मुलांसाठीही ''महाराष्ट्राच्या इतिहासाच्या सोप्या गोष्टी', 'हिंदुस्थानचा प्राथमिक इतिहास' असे विविध ग्रंथांचेही लेखन त्यांनी केले होते. सरदेसाईंनी ऐतिहासिक तसेच वर्तमानातील महत्वाच्या विषयांवर विविध लेख नियतकालिकांमधून लिहिले होते. असे ३६० लेख त्यांनी लिहिले होते. अशा या प्रकांड इतिहासकाराचे वयाच्या ९४ व्या वर्षी २९ नोव्हेंबर १९५९ रोजी कामशेत मुक्कामी निधन झाले होते.

मृत्युपुर्वी सरदेसाईंनी आपला स्वतःचा शेकडो पुस्तकांचा ग्रंथसाठा व संग्रह पुणे विद्यापिठाला दान केला होता. तो आता पुण्याच्या डेक्कन काॕलेजात ठेवला आहे. तसेच त्यांच्या सर्व पत्रव्यवहारांच्या फाईली मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात त्यांनी स्वतः जमा केल्या होत्या. आज इतिहासाच्या जिज्ञासूंना त्या फार उपयुक्त ठरत आहेत.

गो. स. सरदेसाईंचे इतिहास लेखनक्षेत्रातील भरघोस योगदान बघून, यदुनाथ सरकारांनी त्यांचा 'सर्वश्रेष्ठ मराठ्यांचा विद्यमान इतिहासकार' या शब्दात गौरव केला होता. सरदेसाईंना अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते.त्यात ब्रिटिश प्रशासनाने त्यांना प्रथम

१) १९३३ साली 'रावसाहेब' ,

२)१९३८साली 'रावबाहादूर',

३) १९४६साली राजवाडे संशोधन मंदिर धुळे,ने त्यांनी 'इतिहास मार्तंड' हि पदवी आणि सुवर्णपदक देऊन गौरव केला होता.

४)तसेच पुणे विद्यापिठाने त्यांना १९५१साली डि. लीट ही बहुमानाची पदवी देऊन गौरविले होते. आयुष्याच्या आखेरच्या दिवसात सरदेसाईंनी १९५६साली 'माझी संसारयात्रा' हे आत्मचरित्र लिहिले होते.

५) तर १९५७ साली महाराष्ट्र शासनाने त्यांना पद्मभुषण पुरस्कार देवून गौरविले होते. अशा या गुणी कायस्थ शेतकरी पुत्राचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात १७ मे १८६५ रोजी झाला असुनही आपल्या लेखन, माहिती व ज्ञानाच्या बळावर त्यांनी जे सर्वोच्च स्थान प्राप्त केले होते, त्याला तमाम महाराष्ट्रातील इतिहासकारांच्या यादीत तोड नाही. आपल्या लेखनाच्या बळावर ब्राह्मणांच्या कमरेला लटकलेल्या ज्ञानभांडाराच्या चाव्या त्यांनी सहज काढून घेतल्या होत्या. त्यांच्या कार्याने मराठी वाडःमयातील भल्या भल्यांना इतिहासकारांना, शब्दप्रभूंना आश्चर्यचकित केले होते.

गो. स. सरदेसाईंचा हा लेखन प्रवास आजच्या पिढीतील नवोदित लेखाकांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही. परंतु कोकणातील एका कायस्थ शेतकऱ्याच्या मुलांचे "रिडर ते रियासतकार " हा अद्वितीय प्रवास केवळ सयाजीराव महाराज गायकवाडांच्या रत्नपारखी नजरेमुळे झाला होता, हे ऐतिहासिक सत्य आपल्याला नाकारता येणार नाही. तरीही यात सरदेसाईंचे कतृत्वही तितकेच महान आहे. म्हणून आजच्या त्यांच्या १८७ व्या जयंतीदिनी त्यांना ही शब्दसुमनांची माळा अर्पण करतांना विशेष कृतज्ञताभाव दाटून येत आहे.

- राजाराम सूर्यवंशी

(लेखक सत्यशोधक चळवळीचे व भारतीय इतिहासाचे गाढे अभ्यासक )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT