Bihar-CM-Nitish-Kumar 
देश

नितीशकुमार म्हणताहेत, 'राज्यात दोनशे जागा जिंकू!'

वृत्तसंस्था

पाटणा : 'बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) कसलेही मतभेद नाहीत, पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमची आघाडी दोनशेपेक्षाही अधिक जागा जिंकेल, आता संयुक्‍त जनता दल (जेडीयू) आणि भाजपमध्ये विसंवाद निर्माण करू पाहणारे नंतर अडचणीत येतील,' असा दावा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केला आहे. ते शुक्रवारी (ता.20) 'जेडीयू'च्या वतीने आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. 

माझ्यावर वैयक्तिक टीका करणाऱ्यांची राजकीय समज कमी आहे, केवळ प्रचारासाठी म्हणून ते अशाप्रकारची वाह्यात विधाने करत आहेत. माझ्यावर टीका केल्याने काही लोकांना आनंद होतोय; पण राज्यातील जनता माझ्या कामांमुळे आनंदी आहे. काहींना माझ्यावर टीका केल्याने अतीव आनंद होतो, हाच त्यांच्यासाठी 'यूएसपी' असल्याची बाबदेखील त्यांनी मूर्खपणाने मान्य केली असल्याचे नितीशकुमार यांनी नमूद केले.

विरोधकांच्या आक्षेपार्ह टीकेचा कार्यकर्त्यांनी युक्तिवाद करू नये, असा सल्लाही नितीशकुमार यांनी या वेळी पदाधिकाऱ्यांना दिला. कार्यकर्त्यांनी 2010च्या निवडणुका आठवाव्यात, तेव्हा आमच्या पक्षाला बहुमत मिळणार नाही, अशी शक्‍यता वर्तविली जात होती; पण तेव्हा आमच्या पक्षाला घसघशीत बहुमत मिळाले होते. पुढील निवडणुकीमध्येही याचीच पुनरावृत्ती होईल यात शंका नाही, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या :

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

IND vs WI, 3rd ODI: केएल राहुलचं क्लासिकल शतक! रोहित-ऋतुराजची अर्धशतकं; भारताने वेस्ट इंडिजसमोर उभा केला धावांचा डोंगर

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Latest Marathi News Live Update : आरोपी नीलेश आरते याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

SCROLL FOR NEXT