road romeo scholar girl accident death uttar pradesh 
देश

दुचाकीवर बसलेली असताना रोडरोमिओ आले अन्...

वृत्तसंस्था

लखनौ (उत्तर प्रदेश): एक हुशार मुलगी अमेरिकेत शिक्षण घेत होती. सुट्टी असल्यामुळे ती भारतात आली होती. काकांसोबत दुचाकीवरून प्रवास करत असताना रोडरोमीओंनी छेड काढण्यास सुरवात केली. अखेर तिला जीवाला मुकावे लागले. सुदीक्षा भाटी असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे.

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात छेडछाडीची घटना घडली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सुदीक्षा ही अमेरिकेत स्कॉलरशिपवर उच्च शिक्षण घेत होती. सुट्ट्यांमुळे घरी आली होती. रविवारी ती तिच्या काकांसोबत दुचाकीवरून प्रवास करत होती. प्रवासादरम्यान एका बुलेटवरून आलेल्या दोघा रोडरेमिओंनी तिची छेड काढायला सुरुवात केली. बुलेटवरून त्यांच्या दुचाकीजवळ फिरून तिच्यावर अश्लील टिपण्णी करू लागले. शिवाय, स्टंटबाजीही करू लागले. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तिच्या काका शांतपणे दुचाकी चालवत होते. मात्र, त्या रोडरोमिओंनी त्यांची बुलेट काकांच्या दुचाकीसमोर नेऊन आडवी घातली. अचानक आडवी मारल्यामुळे काकांनी दुचाकीला ब्रेक मारला. यामुळे काका आणि सुदीक्षा दुचाकीवरून खाली पडले. सुदीक्षाच्या डोक्याला गंभीर दुःखापत झाल्यामुळे तिचा जागेवरच मृत्यू झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती समजल्यानंतर नातेवाईकांसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतमबुद्ध नगरमध्ये राहणाऱ्या सुदीक्षाची घरची परिस्थिती नाजूक आहे. सुदीक्षाचे वडील ढाबा चालवतात. तरीही प्रतिकूल परिस्थितीत तिने शिक्षणात भरारी घेतली. बारावीमध्ये राज्यात पहिली आलेली सुदीक्षा उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिपवर अमेरिकेत गेली होती. पण, रोडरोमिओंमुळे तिला जीवाला मुकावे लागल्यामुळे खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maya Kulkarni Death : कोल्हापूर महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याचा गाव तलावात आढळला मृतदेह; मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट

Pune Fire Safety: पुण्यात अग्निसुरक्षेचा बडगा; नियमभंग करणाऱ्या ४४७ आस्थापनांना नोटिसा, आठ दिवसांत यंत्रणा उभारण्याचे आदेश

Gokul Election Seat Sharing Formula : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; मंत्री मुश्रीफ नाराज? फॉर्म्युला ठरला, पण घोषणा लांबणीवर

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; पालघरमधून मनसैनिक-शिवसैनिक मुंबईत दाखल

पूर्णेकर हत्याकांडात नवे धागेदोरे! गोळीबार करणारा पवार; संशयित 'लावण्य' तरुणीचीही ‘एसआयटी’कडून चौकशी

SCROLL FOR NEXT