RRB NTPC Protest Team eSakal
देश

बिहार रेल्वे भरती वाद : आंदोलन चिघळणार? विद्यार्थ्यांनी पुकारला बंद

रेल्वे भरती परीक्षांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे.

सुधीर काकडे

रेल्वे भर्ती परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत बिहार (Bihar) आणि उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) काही जिल्ह्यांत विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन (RRB NTPC Protest) सुरू केलं आहे. त्यातच काल बिहारच्या गया शहरात आंदोलकांनी रेल्वेचे डबे पेटवून दिल्याने या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करण्यास सुरूवात केली असून, शेकडो लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यानंतर आता पुन्हा आंदोलक विद्यार्थ्यांच्या वतीन उद्या बिहार बंदची हाक देण्यात आली आहे.

आंदोलनामुळे राज्यात वातावरण तापलं आहे. परीक्षा देणाऱ्यांनी कायदा सुव्यवस्था हातात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर त्याला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी काही ठिकाणी लाठीचार्ज केला. तर काही ठिकाणी हवेत गोळीबार करण्यात आला. दरम्यान, आंदोलन चिघळल्यानंतर परिक्षार्थींनी थेट ट्रेन पेटवून दिली. या प्रकरणात खान सर या प्रसिद्ध युट्यूबरसह अनेक कोचिंग क्लास चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलं. हजारो रेल्वे परीक्षार्थी सोमवारी बिहारमधील पाटना येथे रेल्वे स्थानकावर जमले होते. खान सरसह काही इतर कोचिंग क्लासचे संचालक आणि 400 हून अधिक अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मंगळवारी संध्याकाळी राजेंद्र नगर रेल्वे टर्मिनल आणि भिकना पहाडी येथे हिंसाचार घडवून आणणे आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT