kerala-lottery 
देश

नशीब दुसरं काय! पश्चिम बंगालच्या मजुराला केरळमध्ये लागली 80 लाखांची लॉटरी

सकाळन्यूजनेटवर्क

तिरुवनंतपुरम- कोणाचं नशीब कधी आणि कुठे चमकेल, याचा काही नेम नसतो. असाच प्रकार मुळच्या पश्चिम बंगाल, पण सध्या केरळमध्ये काम करणाऱ्या एका मजुरासोबत घडून आला आहे. पश्चिम बंगालच्या स्थलांतरित मजुराला केरळ सरकारच्या कारुण्य लॉटरीमध्ये तब्बल 80 लाखांचं बक्षीस मिळालं आहे. प्रतिभा मंडल असं या स्थलांतरित मजुराचे नाव असून, त्या केरळच्या तिरुवनंतपुरम येथे बांधकाम मजुर म्हणून आल्या होत्या. लॉटरी लागल्याने प्रतिभा मंडल यांना गगनात मावेना, इतका आनंद झाला असून त्यांना यावर विश्वासही बसत नाहीये. प्रतिभा यांनी 40 रुपयांचे लॉटरी तिकीट घेतले होते.  त्यांना याच 40 रुपयांनी 80 लाखांची लॉटरी मिळवून दिली आहे. एका क्षणात नशीब फळफळल्याने देव जेव्हा देतो, छप्पर फाडून देतो असंच म्हणालं लागेल. प्रतिभा एका रात्रीत लखपती झाल्या आहेत. 

प्रतिभा मंडळ यांना आपल्याला लॉटरी लागलीये यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. अचानक मिळालेल्या या धनादेशामुळे त्यांना हवेत उडत असल्याचा भास होऊ लागला आहे. शिवाय त्यांना आता भीतीही सतावू लागली आहे, ती म्हणजे लॉटरी तिकीट चोरी होण्याची. त्याचमुळे त्यांनी सरकारकडून सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. प्रतिभा या थेट पूजापुरा पोलिस स्टेशनमध्ये गेल्या आणि त्यांनी आपली चिंता व्यक्त केली. 

अनेक स्थलांतरित मजुरांप्रमाणे प्रतिभा मंडळ यांच्याकडेही बँकेमध्ये खाते नाहीये. पोलिसांनी त्यांना कॅनरा बँकेत अकाऊंट काढण्यासाठी मदत केली आहे. शिवाय बँक अधिकारी पोलिस स्टेशनमध्ये आले आणि त्यांनी लॉटरी तिकीट बँक लॉकरमध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी प्रतिभा यांच्याकडून घेतलं. प्रतिभा यांना केवळ हिंदी येते. पोलिसांनी प्रतिभा यांना सर्वोतपरी मदत केली. त्यांना बँक लॉकरपर्यंत जाण्यासाठी पोलिसांनी त्यांची गाडीही दिली होती. 

कारुण्या लॉटरी दर गुरुवारी काढली जाते, त्याचे पहिली बक्षीस 80 लाख रुपये आहे. दुसरे बक्षीस 10 लाख रुपयांचे आहे. बक्षीसाची रक्कम 5 हजारापेक्षा कमी असल्यास केरळमधील कोणत्याही लॉटरी शॉपमधून पैसे काढता येतात. पण, त्यापेक्षा अधिक रक्कम असल्यास ओळखपत्र सरकारी लॉटरी ऑफीसमध्ये दाखवावे लागते. शिवाय बक्षीस जिंकणाऱ्याला आपले तिकीट 30 दिवसांपर्यंत जमा करावे लागते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT