देश

गडकरींची इच्छा असेल, तर...- मोहन भागवत

वृत्तसंस्था

देहरादून: गडकरींच्या मनात काही असेल काही इच्छा असेल तर ते आधी मला सांगतील असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आहेत. यावर भागवत यांनी भाष्य केलं आहे. षडयंत्र रचणं हा गडकरींचा स्वभाव नाही, असेही भागवत यांनी म्हटले आहे. ते देहरादूनमध्ये बोलत होते. 

गडकरी त्यांच्या वक्तव्यांमधून अप्रत्यक्षपणे पक्ष नेतृत्त्वावर निशाणा साझत असल्याची राजकीय वर्तुळात आहे. यावरच बोलताना भागवत म्हणाले की, गडकरींचा स्वभाव तसा नाही. 'नितीन गडकरींचा स्वभाव अतिशय सौम्य आहे. कटकारस्थान करणं हा त्यांचा स्वभाव नाही. असेही भागवत यावेळी म्हणाले.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भाजपाच्या पराभवानंतर नितीन गडकरींनी केलेल्या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पराभवाची जबाबदारी नेतृत्त्वाची असते. तुमचे खासदार काम करत नसेल, तर त्यासाठी तुम्ही जबाबदार असता, अशा आशयाचं विधान गडकरींनी केलं होतं. यानंतर काही दिवसांपूर्वीच, जो आपले घर सांभाळू शकत नाही, तो देश काय सांभाळणार? असा सवाल त्यांनी विचारला होता. त्यामुळे गडकरी अप्रत्यक्षपणे मोदींवर निशाणा साधत असल्याची चर्चा होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT