modi bhagwat 
देश

RSS चं भाजपवर नियंत्रण राहिलं नाही; शेतकरी नेत्याचं सरसंघचालकांना पत्र

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली - महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव हा मोदी सरकारच्या विरोधातील लोकांनी दिलेला कौल असल्याचा दावा विदर्भातील शेतकरी नेके आणि वसंतराव नाईक कृषी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे. याबाबत त्यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना एक खुलं पत्रही लिहलं असून यामुळे राजकीय चर्चांणा उधाण आलं आहे. 

एकेकाळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे निकटवर्तीय असलेले किशोर तिवारी आता शिवसेनेचे नेते आहेत. त्यांनी सरसंघचालकांना लिहिलेल्या पत्रात 60 लाख शिक्षित मतदारांनी हा कौल दिला आहे. तिवारींनी या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतही अनेक प्रश्न विचारले असल्याचं वृत्त डेक्कन हेरॉल्डने दिलं आहे.

भाजपच्या पारंपरिक मतदारसंघांमध्येही त्यांना पराभव पत्करावा लागला. हा पराभव मोदी सरकारविरोधात सर्वसामान्यांच्या मनातील असंतोष असल्याचं तिवारी यांनी पत्रात लिहिलं आहे. किशोर तिवारी यांचं हे गेल्या दोन वर्षातील पाचवं पत्र असून त्यात म्हटलं आहे की, तुम्हाला माझे विचार पटतील किंवा पटणार नाही. पण संघाचा एक जुना अनुभवी स्वयंसेवक म्हणून हे पत्र लिहण्याचं कारण खूप गंभीर आणि गरजेचं आहे. देश विदेशातील सर्व स्वयंसेवकांना विधान परिषदेच्या या निकालाने आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत, योगींच्या गोरखपूरमध्ये आणि आरएएसच्या नागपूरमध्ये भाजपचे नेटवर्क असूनही त्यांनी जागा गमावल्या. वाराणसी, अलाहाबाद, झाशी, गोरखपूर, पुणे, नागपूर आणि अमरावतीत पराभव हा भाजपसाठी मोठा झटका आहे असंही त्यांनी म्हटलं.

तिवारी यांनी 2019 मध्ये भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी आता संघाचं भाजपवर नियंत्रण राहिलं नसल्याचं म्हटलं आहे. संघ परिवाराच्या थिंक टँकसाठी सध्याच्या या घडामोडी गांभीर्याने घेण्याचा मुद्दा आहे असंही तिवारी यांनी सांगितलं आहे. 

तिवारी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना राजकीय प्रकरणात त्यांच्या पत्नीचा वाढलेला हस्तक्षेप आणि अमृता वाणीच्या माध्यमातून पसरलेला विषारी प्रकार रोखण्याचा प्रयत्न मी नेहमी केला होता असंही म्हटलं आहे. आता असा संदेश पसरवला गेला आहे की, भगवान इंद्र आणि त्यांची अमृतावाणी राज्य भाजपचे सर्वेसर्वा आहेत. त्यामुळे आता भाजपमध्ये संघाने लक्ष घालावं असंही तिवारी यांनी पत्रात म्हटलं आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Maharashtra News Updates : मोटारसायकल चोराला अटक, तीन बाईक्स जप्त

Explained: धावताना छातीत का दुखते? डॉक्टरांनी सांगितले 'हे' 5 कारण

उपमुख्यमंत्री शिंदेंनी कोणत्या अधिकाराखाली स्थगिती दिली? हायकोर्टाची विचारणा, बेकायदा इमारत प्रकरणी अडचणी वाढणार

SCROLL FOR NEXT