Air India
Air India Sakal
देश

युक्रेनमधील भारतीयांना आणणारं विमान ४ वाजता मुंबईत उतरणार

सकाळ डिजिटल टीम

युक्रेन आणि रशियात मिळून जवळपास ३२ हजार विद्यार्थी अडकून पडले आहेत.

नवी दिल्ली - युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी वेगाने हालचाली केल्या जात असून भारतीयांना रोमानियातून एअर इंडियाच्या (Air India) विमानाने आणलं जात आहे. आज सायंकाळी ४ वाजता मुंबईत एक विमान भारतीयांना घेऊन उतरेल. केंद्रीय मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपस्थित असणार आहेत.

रशियाने (Russia) केलेल्या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला आहे. दोन्ही देशामधील संघर्षात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. अद्याप भारताचे हजारो नागरिक अडकले आहेत. युक्रेनमध्ये आजमितीस १८ हजार भारतीय विद्यार्थी आहेत. रशियात त्यांची संख्या १४ हजार आहे. या दोनच देशांतील वैद्यकीय विद्यार्थ्यांची संख्या ३२ हजार आहे.

रशियाने हल्ला केल्यानंतर युक्रेनने हवाई क्षेत्र बंद केलं आहे. त्याआधी एअर इंडियाने २२ फेब्रुवारीला युक्रेनची राजधानी किवला एक विमान पाठवलं होतं. त्यातून २४० जणांना भारतात परत आणण्यात आलं होतं. त्यानंतर २४ आणि २६ फेब्रुवारीला दोन आणखी विमाने जाणार होती, मात्र २४ तारखेलाच रशियाकडून हल्ला सुरु झाला. त्यानंतर युक्रेनने हवाई क्षेत्र बंद कऱण्यात आल्याची घोषणा केली. एअर इंडियाने शुक्रवारी रात्री ट्विटरवरून माहिती दिली की, दिल्ली आणि मुंबईतून शनिवारी बी ७८७ विमान बुखारेस्ट आणि बुडापेस्टला जातील.

भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी याचिका

युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांना तातडीने मायदेशी परत आणण्याचे आदेश सरकारला द्यावेत, अशा मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली. विशाल तिवारी या वकिलाने केलेली ही याचिका न्यायालयाने दाखल करून घेतली असून त्यावरील सुनावणीची तारीख मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. ज्यांना भारतात ‘नीट’ परीक्षेत कट ऑफ यादीत येऊनही वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश मिळत नाही अशांसह हजारो विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

SCROLL FOR NEXT