Nina Kutina Gokarna Case esakal
देश

Russian Woman : काहीच काम नसले तरी पाहिजे तेव्हा पैसे मिळायचे; गुहेतल्या रशियन महिलेने काय सांगितले?

Nina Kutina Gokarna Case : गोकर्णमधील गुहेत दोन मुलांसह राहणारी रशियन महिला सध्या चर्चेत आली आहे. भारतात स्थायिक राहण्यामागील तिची कारणे आणि जीवनशैली लक्षवेधी ठरत आहेत.

Saisimran Ghashi

थोडक्यात..

  • रशियन महिला आणि तिच्या दोन मुली 7 वर्षे गोकर्णच्या गुहेत राहत होत्या.

  • तिने डॉक्टरांशिवाय स्वतःच प्रसूती केली आणि वेगवेगळ्या देशांत प्रवास केला.

  • काहीच काम नसले तरी हवे तेव्हा पैसे कसे मिळायचे, याचेही उत्तर तिने दिले आहे

Russian woman living in cave in India : कर्नाटकातील गोकर्णमध्ये सध्या एक आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. एका गुहेत दोन मुलींनिशी राहणारी रशियन महिला सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. रशियन महिलेचं नाव निना कुटिना असं असून २०१७ मध्ये व्हिसाची मुदत संपल्यापासून ती भारतात अनेक ठिकाणी जंगलांमध्ये राहतेय. मात्र, तरीही ती रशियाला परतली नाही. तिची जीवनशैली, जगभरातील भ्रमंती, स्वतःच केलेली प्रसूती आणि निसर्गाशी जोडलेलं जीवन यामुळे ती चर्चेत आली आहे. त्याचबरोबर तिला काम मिळायचे नाही तेव्हा तिचा उदरनिर्वाह कसा व्हायचा याबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित झाले तिने याचेही उत्तर दिले आहे

या महिलेने स्वतः दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १५ वर्षांत तिने सुमारे २० देशांचा प्रवास केला. तिची मुले वेगवेगळ्या देशांमध्ये जन्माला आली आहेत. विशेष म्हणजे, तिने कोणत्याही डॉक्टर किंवा रुग्णालयाच्या मदतीशिवाय स्वतःच प्रसूती केली. “माझ्या शरीराच्या आणि प्रसूती प्रक्रियेच्या माहितीसह मी ही सर्व जबाबदारी स्वतः स्वीकारली. मला कोणीही मदत केली नाही,” असे ती म्हणते.

गोकर्णमधील एका गुहेत ती आपल्या दोन मुलींनिशी राहत होती. तिला गुहेत राहण्यामागील कारणं सांगताना ती म्हणाली, “आम्ही सूर्योदयाबरोबर उठायचो, नद्यांमध्ये पोहायचो, गाणी म्हणायचो, रंगकाम करायचो आणि निसर्गाच्या सान्निध्यात शांत जीवन जगायचो.” हवामानानुसार ती शेकोटीवर किंवा गॅस सिलेंडरवर स्वयंपाक करत असे, आणि आवश्यक वस्तू जवळच्या गावातून खरेदी करत असे.

सध्या मात्र ही महिला आणि तिची मुले एका अस्वस्थ ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. “आम्हाला घाणेरड्या ठिकाणी ठेवलं आहे. इथे गोपनीयता नाही, फक्त साधा भात खायला मिळतो. आमचं अनेक सामानही काढून घेण्यात आलं आहे, ज्यात आमच्या नऊ महिन्यांपूर्वी मृत झालेल्या मुलाचे अवशेषही होते,” अशी व्यथा तिने मांडली.

पैसा कसे मिळवायचे यावर ती सांगते, “मी कला आणि संगीत व्हिडिओ बनवून, लोकांना शिकवून किंवा लहान मुलांची देखभाल करून पैसे कमवायचे. कधी कधी मला माझा भाऊ, वडील आणि मुलगा आर्थिक मदत करत असत. आम्हाला हवे तेवढे पैसे मिळायचे.”

ती महिला रशियाला का परतली नाही, यावर सांगते, “माझ्या काही अतिशय जवळच्या व्यक्तींचं निधन झालं. त्यामुळं मी खचले आणि रशियात परत जायचं ठरवलंच नाही. आम्ही अजून चार देशांतून प्रवास करत भारतात आलो कारण आम्हाला भारतातील वातावरण, निसर्ग आणि येथील माणसं खूप आवडली.”

सध्या ती महिला रशियन दूतावासाच्या संपर्कात असून तिच्या आणि तिच्या मुलींच्या भविष्यातील सुरक्षिततेसाठी प्रयत्न सुरू आहेत. तिची ही कहाणी एक वेगळीच जीवनदृष्टी देऊन जाते समाजाच्या चौकटीबाहेर राहून निसर्गाशी एकरूप झालेलं एक अनोखं जीवन.

FAQ

  1. ही रशियन महिला भारतात कधीपासून राहत आहे?
    ती २०१७ पासून भारतात राहते असून, तिचा व्हिसा तेव्हाच संपला आहे.

  2. निना कुटिना पैसे कसे कमवते?
    कला, संगीत व्हिडीओ, मुलांची देखभाल व शिकवण्याद्वारे ती पैसे कमवते.

  3. तिच्या मुलांचा जन्म कोठे झाला?
    तिच्या मुलांचा जन्म वेगवेगळ्या देशांमध्ये झाला आहे आणि ती स्वतःने त्यांची प्रसूती केली.

  4. ती गुहेत का राहत होती?
    ती निसर्गाच्या सान्निध्यात शांत जीवन जगण्यासाठी गुहेत राहत होती.

  5. तिच्या सध्याच्या स्थितीबद्दल काय माहिती आहे?
    सध्या तिला अस्वच्छ जागी ठेवण्यात आले असून तिच्या खूप गोष्टी काढून घेण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानभवनाची लॉबी की कुस्तीचा आखाडा? जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा Exclusive Video

NAV in Mutual Funds: म्युच्युअल फंडातील NAV म्हणजे काय? जाणून घ्या सोप्या भाषेत

Consanguineous Marriage: नात्यातील विवाह की आजारांचा वारसा? पुढच्या पिढीचं आरोग्य वाचवणारा सल्ला

BCCI Video: लॉर्ड्सवर भारताच्या 'यंगिस्तान'ची हजेरी! U19 कर्णधाराने स्टेडियममध्येच केला वाढदिवस साजरा; वैभव सूर्यवंशीही भारावला

Gopichand Padalkar: विधानभवनात राडा झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया; 'मला आमदार म्हणून रहायचं नाही...'

SCROLL FOR NEXT