External Affairs Minister S Jaishankar’s Russia visit holds strategic importance amid India-US trade war tensions and evolving global alliances.  sakal
देश

S Jaishankar Russia Visit : आता एस जयशंकरही रशियाला जाणार; भारत-अमेरिका 'ट्रेड्र वॉर'मुळे दौऱ्याला विशेष महत्त्व!

India-US Trade War Strategic Diplomacy: काही दिवासांपूर्वीच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी रशियाला जाऊन, पुतीन यांची भेट घेतली.

Mayur Ratnaparkhe

S Jaishankars Russia visit gains significance amid India-US trade war tensions : भारत-रशिया यांच्यातील वाढत्या व्यापारी संबंधांमुळे नाराज झालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी, भारतावर अन्यायकारकरित्या ५० टक्के टॅरिफ लादला आहे. ज्यामुळे भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये काहीशी कटुता निर्माण होत असल्याचे दिसत आहे. भारतानेही अमेरिकेसमोर आपली भूमिका ठामपणे स्पष्ट केली आहे. तर याच दरम्यान दुसरीकडे भारत आणि रशिया यांच्यासंबंधी अधिकच घट्ट होत आहेत.

कारण, काही दिवासांपूर्वीच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी रशियाला भेट दिली आणि त्यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन तसेच मॉस्कोमध्ये अनेक वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर आता भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे देखील रशियाला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. एस जयशंकर हे तेथे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांना भेटणार आहेत.

रशियन परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टद्वारे याबाबत माहिती देताना सांगितले की, ‘’२१ ऑगस्ट रोजी मॉस्कोमध्ये भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांची भेट होणार आहे. या बैठकीत आंतरराष्ट्रीय चौकटीअंतर्गत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहकार्यावर चर्चा केली जाईल. यासोबतच दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांवरही चर्चा केली जाईल.’’

 रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल आणि युक्रेन युद्धाला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपावरून अमेरिकेने भारतावर जादा टॅरिफ लादला आहे. तसेच, अमेरिकन सरकार सध्या पाकिस्तानशी जवळीक वाढविण्यात व्यस्त आहे. अशा परिस्थितीत, भारत देखील त्याच्या सर्व पर्यायांवर विचार करताना दिसत आहे.

याशिवाय, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन  हे देखील या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत, आता  दोन्ही परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत पुतीन यांच्या भारत भेटीच्या तयारीबाबतही चर्चा होवू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: 'सातारा जिल्ह्यातील आशिष महांगरे बनला संशाेधक'; जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी, जर्मनीत करणार संशोधन

Pune : जिम ट्रेनर तरुणीने दुकानाच्या दारातच केली तरुणाची हत्या, घटनेनंतर स्वत: पोलिसात हजर; मित्रासह दोघांना अटक

Pakistan Independence Day : पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनीच पसरली शोककळा, हवेत गोळीबारात चिमुकलीसह ३ ठार, ६५ गंभीर जखमी

Chh. Sambhajinagar: “मैं जा रहा हूँ” असा मेसेज पाठवून २३ वर्षीय युवकाने संपवले जीवन; वाळूज एमआयडीसी परिसर हादरला

Satara News: अकरावी प्रवेशासाठी आता ‘विशेष फेरी’; मंगळवारपासून प्रवेश निश्‍चित करता येणार, सुधारित वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT