Sachin Pilot And Rahul Gandhi esakal
देश

राजकारणात दिसतं तस नसतं; काँग्रेस अध्यक्षपदासंदर्भात पायलट यांचं सूचक विधान

सकाळ डिजिटल टीम

जयपूर: राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी बुधवारी काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष पदाबाबतच्या शक्यतांवर मोठं विधान केलं आहे."राजकारणात जे दिसते ते घडत नाही आणि पक्षाध्यक्ष कोण होईल हे ऑक्टोबरमध्ये स्पष्ट होईल, असंही सचिन पायलट यांनी म्हटलं. त्यामुळे सचिन पायलट अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Sachin pilots news in Marathi)

गुलाम नबी आझाद यांच्यासह अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, या लोकांचा निर्णय योग्य की अयोग्य हे जनता आणि काळ ठरवेल. पत्रकारांशी संवाद साधताना पायलट यांना काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत सुरू असलेल्या अटकळींबाबत विचारले असता ते म्हणाले, कोणीतरी म्हटलच आहे, 'राजकारणात जे दिसतं ते घडत नाही, जे घडते ते दिसत नाही. त्यामुळे थोडं थांबा सर्वकाही बाहेर येईलच. पक्षात मी असो असो वा अन्य कोणी पक्षादेश सर्वांसाठी महत्त्वपूर्णच आहे.

आझाद आणि इतर नेत्यांनी पक्ष सोडला त्यावर पायलट म्हणाले की, "भाजप आणि केंद्र सरकारच्या विरोधात सुरू असलेल्या लढाईत खांद्याला खांदा लावून उभं राहण्याची वेळ होते. मात्र कुठेतरी या नेत्यांनी त्यांच्या जबाबदारीपासून पळ काढला. ज्यांना पक्षाने खूप काही दिलं त्यांच्यासाठी आज पक्षाला परत देण्याची वेळ आली आहे, असे खुद्द सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. मात्र नेत्यांनी तस करण्याऐवजी पक्ष सोडला. तरी त्यांचा निर्णय किती चुकीचा आणि कितपत योग्य होता हे जनता आणि काळ ठरवेल, असंही पायलट यांनी नमूद केलं.

महागाईवर केंद्र सरकारवर निशाणा साधत पायलट म्हणाले की, आम्ही महागाई नियंत्रणात आणू, असे आश्वासन देखील केंद्र सरकारने आजपर्यंत दिलं नाही. लोकसभेच्या अधिवेशनातही सरकारकडून याबाबत कोणतेही आश्वासन दिले गेले नसल्याचं त्यांनी म्हटलं. पायलट म्हणाले, "केंद्र सरकार चतुराईने सार्वजनिक हिताच्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्याचे काम करते जेणेकरून ते मुद्दा बनू नयेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT